श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संभेराव कुटूंबियांचे श्रध्दास्थान – हास्यजत्रा कलाकार नम्रता संभेराव
महेश इंगळे यांच्या मुखातून सुबक शब्दात मंदिर समितीच्या कार्याचे वर्णन ऐकून सुखावले.
स्वामी दर्शनानंतर हास्यजत्रा कलाकार नम्रता संभेराव यांचे भावोद्गार.
(श्रीशैल गवंडी,अ.कोट, दि.०२/०८/२०२५) येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे समर्थांचे मूळस्थान असून आम्हा संभेराव कुटुंबीयांचेही मुख्य श्रद्धास्थान असल्याचे मनोगत स्वामी दर्शनानंतर हास्यजत्रा कलाकार नम्रता संभेराव
यांनी व्यक्त केले. ते आज येथील श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून
श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी नम्रता संभेराव यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी
नम्रता संभेराव बोलत होत्या. पुढे बोलताना नम्रता संभेराव यांनी महेश इंगळे यांनी त्यांचे वडील व देवस्थानचे मा.चेअरमन तथा स्वामी सेवक कै.कल्याणराव इंगळे यांच्या पश्चात श्री वटवृक्ष मंदिरातील व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची जबाबदारी स्वीकारून अत्यंत सुबक शब्दात मंदिर समितीच्या कार्याचे वर्णन करीत आपल्या जीवनात्मक दिशेला स्वामी सेवेची जोड देत आहेत हे पाहून अत्यंत आनंद झाले असून सुखावलो असल्याचे सांगितले. श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन मलाही आनंद तर झालेला आहेच वयोवृद्ध, ज्येष्ठ, दिव्यांग भाविकांसाठी मंदिरात असलेली स्वतंत्र दर्शन व्यवस्था पाहून मन प्रसन्न झाले असल्याचे सांगून राज्यभरात याचा आदर्श निर्माण होईल असेही मनोगत व्यक्त करून मंदिर समितीच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, व स्वामी भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – हास्यजत्रा कलाकार नम्रता संभेराव यांचा वटवृक्ष मंदीर कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!