गावगाथा

आचेगाव रस्ता खचतोय, राष्ट्रीय रस्ते महामार्ग दुर्लक्षित

नागरिकांनी वारंवार राष्ट्रीय रस्ते महामार्ग मंडळाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे.

आचेगाव रस्ता खचतोय, राष्ट्रीय रस्ते महामार्ग दुर्लक्षित

सोलापुर, वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथून आचेगावकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग एका बाजूने खचत आहे. नागरिकांनी वारंवार राष्ट्रीय रस्ते महामार्ग मंडळाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथून तेरा मैल दक्षिण सोलापूर येथे सोलापूर विजयपूर महामार्गाला जोडला जातो. या महामार्गावरून वळसंग येथे बाजूचा भराव वाहून गेल्याने रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावर पश्चिमेकडील दत्तनगर भागातून येणारे पावसाचे पाणी रस्ता ओलांडून जात असल्याने एका बाजूचा रस्ता खचत आहे. याच रस्त्यावरून वळसंग येथे चार जिल्हा परिषद शाळा एक खाजगी प्राथमिक शाळा, दोन हायस्कूल इत्यादीचे विद्यार्थी व ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात येता करत असतात. त्यातच या रस्त्यावरून सिमेंट बल्करची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. काही दिवसांनी जय हिंद शुगरची ही वाहतूक सुरू होणार आहे त्यामुळे या महामार्गावर अपघात होण्यापूर्वी दुरुस्ती होणे आवश्यक आहे.

चौकट

याच महामार्गावर अॅप्रोच रस्त्याचा प्रश्न बरेच वर्षे प्रलंबित होता. सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच समीर कटरे, ग्रामपंचायत सदस्य मलकप्पा कोडले अनिल बर्वे यांनी वारंवार प्रयत्न करून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीने ठेकेदार व रस्ते विकास महामंडळ यांच्यातील वाद मिटवून हा अॅप्रोच रस्ता दुरुस्त करून घेतला होता.

पश्चिमेकडून येणारे पाणी रस्त्याच्या बाजूने वाहून जाणे आवश्यक आहे ते रस्ता ओलांडून येत असल्याने संपूर्ण रस्ता खराब होत आहे. रस्त्याच्या पश्चिमेकडे मोठी गटार बांधणे आवश्यक आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम वाघमारे यांनी व्यक्त केले. फोटोः वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे एका बाजूने खचत असलेला रस्ता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button