*मोरे प्रतिष्ठान मार्फत मोफत प्रथमोपचार केंद्राचे उदघाटन*
लोकनेते स्व. ब्रह्मानंद मोरे यांच्या स्मरणार्थ, लोकनेते स्व. ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान सोलापूर यांच्या सौजन्याने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या देवी भक्तांसाठी मोफत प्रथमोपचार केंद्र दिनांक 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर 2025 दरम्यान सुरू आहे.
जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून प्रतिष्ठानचे कार्य गेल्या 26 वर्षापासून निरंतरपणे विविध कार्यक्रमाच्या स्वरूपात सुरू आहे
या शिबिराचे उद्घाटक सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे लोकप्रिय आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते पार पडले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बाळासाहेब मोरे, प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष तथा सुप्रसिद्ध उद्योजक श्री प्रमोद भाऊ मोरे सचिव विनोद मोरे यांनी शिबिराचे संपूर्ण नियोजन शिस्तबद्ध करून लोकसेवा केली असून, या शिबिरात विविध तपासण्या, औषधं गोळ्या, मलम, विविध किट मोफत नाश्ता व शुद्ध पाणी वाटप करण्यात येत आहे. या शिबिरात शेठ गोविंद रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय तथा बागेवाडीकर हॉस्पिटल सोलापूर मधील तज्ञ् डॉक्टर यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
या शिबिराच्या यशस्वीते साठी प्रा. टोंपे सर, प्रकाश शिंदे, चेतन मोरे, दिनेश इंगळे, महेश मोरे ऋतुराज मोरे व मित्र प्रेम ग्रुप च्या सर्व कार्यकर्त्यांनी यांनी कष्ट घेतले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!