निवारा केंद्रात वाहतोय माणुसकीचा झरा, दक्षिण सोलापूर तालुक्यात १७ निवारा केंद्र
सोलापुर, सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील १५ गावे बाधित झाली असून या गावातील नागरिकांसाठी १७ ठिकाणी निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. सतरा निवारा केंद्रात जवळपास चार हजार नागरिकांनी निवारा घेतला होता. पूर ओसरल्यामुळे ही संख्या हळूहळू कमी होत आहे. तालुक्यातील सिंदखेड या गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने ५७१ नागरिक गावात अडकले होते. त्या सर्वांना बोटीच्या सहाय्याने आहेरवाडी येथील कै. मल्लप्पा कोनापुरे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत आणण्यात आले. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने या निवारा केंद्रात ४३९ नागरिकांची सोय करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी चहा, नाष्टा, एक वेळचे जेवण, चादर, नवीन कपडे, ब्लॅकेट इत्यादीची सोय करण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सिंदखेड येथील निवारा केंद्रावर टाटा सोलर कंपनीच्या वतीने आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे यासाठी प्रकल्प अधिकारी गुरुशरण सिंग व अभिजीत मुकणे परिश्रम घेत आहेत. चौकट
पूर परिस्थितीमुळे पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी मुरघास उपलब्ध करून दिला आहे. दक्षिण सोलापूर तहसीलचे तहसीलदार किरण जमदाडे मंद्रूप अप्परचे तहसीलदार सुजीत नरहरे उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवारा केंद्रातील परिस्थिती स्वतः हाताळत आहेत. प्रशासनाची धडपड पाहून आहेरवाडी येथील शेतकरी वीरभद्र हगरे यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी एक एकर ऊस उपलब्ध करून दिला आहे. चौकट
तहसीलदार किरण जमदाडे यांनी सिंदखेड निवारा केंद्रावर अंघोळीसाठी गरम पाणी मोबाईल टॉयलेट, सॅनिटरी नॅपकिन याच्यासह तान्हा बाळासाठी गरम दुधाची सोय केली आहे. निवारा केंद्रातून परत जाताना नागरिकांसाठी संसार उपयोगी वस्तू
पीठ, मीठ, तेल, मसाले, चटणी, साबण टूथपेस्ट यांचे किट तयार केले आहे.
भाजप उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे, माजी सभापती गुरुसिध्द म्हेत्रे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती महादेव कोगनुरे यांच्यासह नरसप्मा दिंडोरे भरण्णा गावडे, योगीराज पाटील तालुक्यातील पूरग्रस्तांच्या जेवणाची सोय आठवडाभरापासून करीत आहेत.
प्रत्येक केंद्रावर ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक, शिक्षक यांच्यासह मंडल अधिकारी व नायब तहसीलदार यांची टीम परिश्रम घेत आहे.
फोटो : १ आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथील निवारा केंद्रावर तहसीलदार पूरग्रस्तांसह २ आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथील निवारा केंद्रावरील तान्हे बाळ
Back to top button
×
No WhatsApp Number Found!