गावगाथा

वळसंगचा विकास आराखडा जिल्हा परिषदेकडे सादर

वळसंग, ता. दक्षिण सोलापूर — गावचा विकास आराखडा प्रकल्प संचालक आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करताना.

वळसंगचा विकास आराखडा जिल्हा परिषदेकडे सादर

दक्षिण सोलापूर, 
वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना अंतर्गत गावाचा सर्वसमावेशक विकास आराखडा सोलापूर जिल्हा परिषदेकडे सादर केला. या उपक्रमामुळे वळसंग ही अशा प्रकारचा विकास आराखडा सादर करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

डी. वाय. पाटील महाविद्यालयातील वस्तू विशारद प्रा. पूर्वा नांदोकर यांनी वळसंगमधील सध्याची विकासकामे आणि भविष्यातील विकास आराखडा यांचे प्रभावी सादरीकरण ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक जगताप, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्यासमोर पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे केले.

त्यानुसार, गावात ७०% भूमिगत सांडपाणी व्यवस्थापन आणि ५०% कचरा व्यवस्थापन पूर्ण झालेले आहे. तसेच नागरिकांकडून सांडपाणी व्यवस्थापनाची पूर्तता, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये, सुसज्ज बसस्थानक, भक्त निवास आदी सुविधांची मागणी करण्यात आली.

यशदाचे उपमहासंचालक आणि निवृत्त जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा आराखडा ग्रामविकासातील एक आदर्श उपक्रम ठरणार आहे. या आराखड्याचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामिण चेहरा कायम ठेवत शहरी सुविधा उपलब्ध करून देणे हा मूलभूत उद्देश.

या कार्यक्रमास गटविकास अधिकारी (मनरेगा) अरुण वाघमोडे, नदी समन्वयक दिनकर नारायणकर, सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच समीर कटरे, ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार जाधव, तसेच सदस्य श्रीशैल भुसणगी, विनोद सुरपुरे, मलकप्पा कोडले, शालम अमलिंचुगे, सामाजिक कार्यकर्ते अनिल बर्वे, सिद्धाराम वाघमारे आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

📸 फोटो : वळसंग, ता. दक्षिण सोलापूर — गावचा विकास आराखडा प्रकल्प संचालक आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करताना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button