गावगाथा

उमरगा–जत नवीन बससेवा सुरू; वागदरी परिसरातील प्रवाशांसाठी मोठी दिलासा

आगारप्रमुख प्रभात वेदपाठक यांनी या सेवेला अधिकाधिक प्रवाशांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे.

उमरगा–जत नवीन बससेवा सुरू; वागदरी परिसरातील प्रवाशांसाठी मोठी दिलासा

अक्कलकोट आगारामार्फत उमरगा–जत व्हाया गुड्डापूर या नवीन बससेवेचा शुभारंभ आज मंगळवारी वागदरी बसस्थानकात करण्यात आला. आगारप्रमुख श्री. दत्तात्रेय कुलकर्णी यांनी विधिवत पूजा करून या बसला शुभप्रस्थान दिलं.

HTML img Tag Simply Easy Learning    

गुड्डापूर धानम्मा देवी दर्शनासाठी, तसेच चडचण येथे कपडे खरेदीसाठी जाणाऱ्या मोठ्या संख्येतील भाविक व नागरिकांना सुविधा मिळावी, यासाठी गुಡ್ಡापूर देवस्थान कमिटीचे एम.डी. माननीय राहुल कलबुर्गी यांच्या पाठपुराव्यामुळे ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

नवीन बस उमरगा–वागदरी–अक्कलकोट–सोलापूर–लोणी–चडचण–गुड्डापूर मार्गे जत येथे धावणार आहे. 40 सीट क्षमतेची आरामदायी बस असून सर्व शासकीय योजना या बसला लागू राहणार आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

वेळापत्रक

  • सकाळी 6.30: उमरग्यातून सुटणार
  • सकाळी 8.00: वागदरी आगमन
  • दुपारी 1.30: गुड्डापूर आगमन
  • दुपारी 2.00: जत आगमन

तिकीटदर

  • वागदरी–गुड्डापूर: ₹314
  • वागदरी–चडचण: ₹240
  • अधिक माहितीसाठी संपर्क: 9673659643

आगारप्रमुख प्रभात वेदपाठक यांनी या सेवेला अधिकाधिक प्रवाशांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

पूजाविधी व कार्यक्रमावेळी माननीय श्रीशैल ठोंबरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष लक्ष्मण सलगरे, बसण्णा ढवणे, शिवानंद गोगाव, शिवानंद बाबा, सतीश मांगाणे, श्याम कलबुर्गी, रवी हंचाटे, सुपुत्र ढोपरे, मडेप्प उमराणी, चालक अर्जुन एरंडे, वाहक राजेंद्र बिराजदार यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button