गावगाथा

*अशफाक बळोरगी यांच्या नंतर आता नगरसेवक सद्दाम शेरीकर यांच्या भूमिकेकडे सबंध अक्कलकोट तालुक्याचे लक्ष…काँग्रेस,शिवसेना की भाजप?*

राजकीय घडामोडी

*अशफाक बळोरगी यांच्या नंतर आता नगरसेवक सद्दाम शेरीकर यांच्या भूमिकेकडे सबंध अक्कलकोट तालुक्याचे लक्ष…काँग्रेस,शिवसेना की भाजप?*
——————————–
दि-३/में.
अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणाला सध्या वेगळेच वळण लागले असून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेशाने मरगळीस आलेल्या म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली आहे.
म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले गेल्याचे तथा प्रत्येक कामात आडकाठी आणून म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांना कोंडीत पकडण्याचा तथा सिद्धाराम म्हेत्रे यांना एकाकी पाडून खिंडीत गाठण्याचा प्रयत्न तालुक्यात सध्या सुरू असल्याने कंटाळून शेवटी म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला कोणतेच पाठबळ अथवा साथ मिळत नसल्याने शेवटी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देऊन शिवसेना शिंदे गटाचा शिवधनुष्य आपल्या हाती धरला.
आज अखेर काँग्रेस आणि सुशिलकुमार शिंदे घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशफाक बळोरगी यांनी अक्कलकोट इथं पत्रकार परिषद घेऊन आपण कोणी कुठं ही गेले तरी आपण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे जाहीर केले.
सध्या अशफाक बळोरगी यांच्या भूमिके नंतर आता काँग्रेसचे नगरसेवक तथा युवा नेते म्हणून अक्कलकोट तालुक्यातील हजारो युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून परिचित असलेल्या आणि साम सर्वसामान्य लोकांच्या विधायक कामासाठी, दाम , दंड ,भेद या सर्व गोष्टींसाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या नगरसेवक सद्दाम शेरीकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दोन वेळेस अक्कलकोट नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपद भूषविणाऱ्या स्वर्गीय गफूर शेरीकर चाचा यांच्या तालमीत तयार झालेले नगरसेवक सद्दाम शेरीकर यांच्या मागे तालुक्यातील युवा वर्गाची मोठी फळी असून न्याय निवडा करण्यासाठी त्यांच्याकडे येणाऱ्या तालुक्यातील लोकांचा मोठा ओघ कायम राहिला आहे.
स्वर्गीय सातलींगप्पा म्हेत्रे,माजी आमदार महादेव पाटील,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील,अक्कलकोट नरेश जन्मेजयराजे भोसले यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू तथा सर्व जाती धर्म आणि समाजात समाजसेवी वृत्तीचा युवा कार्यकर्ता म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या नगरसेवक सद्दाम शेरीकर यांची भूमिका सध्या महत्वाची ठरणारी आहे.
सद्दाम शेरीकर हे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला त्याचा नक्कीच फायदा होणारा असून त्यांच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे.
त्यामुळे ते आपल्या हातात कॉंग्रेसचा पंजा पकडणार की सेनेचा शिवधनुष्य का भाजपचा कमळ हे पाहणे देखील मह्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button