गावगाथा

कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेतील भक्तांच्यावतीने महेश इंगळे यांचा सत्कार

सत्कार

कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेतील भक्तांच्यावतीने महेश इंगळे यांचा सत्कार
(श्रीशैल गवंडी,अ.कोट, दि.०३/०१/२६) येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन, नगरसेवक महेश इंगळे यांची अक्कलकोट नगरसेवकपदी सलग पाचव्यांदा निवड झाली. या निमीत्ताने कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेच्या वतीने पदयात्रेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील यांच्या हस्ते सेंद्रिय गुळाची ढेप, शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नगरसेवक महेश इंगळे म्हणाले की गेली दहा वर्षे कोल्हापूर ते श्रीक्षेत्र अक्कलकोट अशी बारा दिवसांची पायी दिंडी दत्त जयंतीला येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येते. पदयात्रेची स्वयंशिस्त, भावपूर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत या इच्छापूर्ती पायी दिंडीने महाराष्ट्रातील अनेक स्वामी भक्तांचे लक्ष वेधले आहे. प्रतिवर्षी कोल्हापूरहून येणाऱ्या यात्रेमध्ये वाढणारी भाविकांची संख्या पाहून कौतुक वाटते असे मनोगत व्यक्त करून आज येथे
कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेतील भक्तांच्या वतीने जो सन्मान झाला आहे त्या बद्दल आपण सर्वांचे आभारी असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, पदयात्रेतील स्वामी भक्त प्रकाश पाटील, रणजित बिरंबोळे, सागर पाटील (निटवडेकर), किरण मोरे, बळवंत पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळ – इच्छापूर्ती पदयात्रेच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांची पाचव्यांदा नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांचा सत्कार करताना कोल्हापूर इच्छापूर्ती पदयात्रेचे अध्यक्ष सुहास पाटील, आणि स्वामी भक्त दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button