यापुढील काळात महाराष्ट्र शत प्रतिशत भाजप झाल्याशिवाय राहणार नाही – बसवराज पाटील
भविष्यामध्ये तुमची मान उंचावेल असे काम करीन
जाहीर आभार सभेत जंगी सत्कार

धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) – धाराशिव-बीड-लातूर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एवढे मोठे यश मिळाले आहे. या ऐतिहासिक यशामुळे मी बाराहून गेलो असून हा विजय मी अतिशय नम्रपणे मिळालेला आहे. तसेच हा विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार रिपाई नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीतील घटक पक्ष सर्व मतदार व कार्यकर्ते यांना हा विजय मी समर्पित करतो. हे मतदान मला नव्हे तर विकासाला दिले आहे कारण देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली विकासाची जी गोड गोड सुरू आहे. ती सगळ्या क्षेत्रात विकासाची आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे यापुढील काळात संपूर्ण महाराष्ट्र शेत प्रतिशत भाजप झाल्याशिवाय राहणार नाही असे ठाम प्रतिपादन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादन केलेले आमदार बसवराज पाटील यांनी दि.२२ जून रोजी केले. दरम्यान, बसवराज पाटील यांचा महायुती घटक पक्षांच्यावतीने जंगी सत्कार करण्यात आला.
भाजप महायुतीचे धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बसवराज पाटील यांचा ऐतिहासिक विजय झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर आभार सभेत ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, धाराशिव जिल्हा बँकेचे चेअरमन तथा मुरुम नगर परिषदेचे नगराध्यक्ष बापूराव पाटील, जस्ट नेते रामकृष्णपंत खरोसेकर, दिलीप भालेराव, युवा नेते मल्हार पाटील, शरण पाटील, भाजपचे मराठवाडा समन्वयक नितीन काळे, सुनील चव्हाण, ऍड अनिल काळे, आमदार अभिमन्यू पवार यांचे प्रतिनिधी परिक्षीत पवार, लातूरचे राम तिरुके, मधुकर तावडे, ऍड वेंकट गुंड, कलबुर्गे, सुभाष जाधव, शेखर सोनवणे, नळदुर्ग चे नगराध्यक्ष बसवराज धरणे, बाळासाहेब पाटील, फुलचंद गुंडुरे, सचिन देवगिरे, स्वप्निल व्हते, प्रकाश आष्टे, बसवराज धाराशिवे, विठ्ठल बदोले, शहा बर्फीवाले, विजयकुमार सोनवणे युवराज बिराजदार, ऍड लक्ष्मीकांत पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, ही निवडणूक एक लोकशाही मार्गाने अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे. या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांचा सहभाग होता या लोकशाहीच्या उत्सवांमध्ये सर्वजण आनंदाने सहभागी झाले व एका चांगल्या विचाराने ही निवडणूक यशस्वी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच धाराशिव बीड व लातूर या तिन्ही जिल्ह्यातील ही निवडणूक असून १८ आमदार व ३ खासदार, ९८८ नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचे प्रतिनिधित्व करते. विकासाची घोडदौड सुरू असून प्रत्येकाला विकास हवा आहे. स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण विकासाला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे उद्याचा महाराष्ट्र सुजला आणि सुफलाम दिसला पाहिजे असे सांगत ते म्हणाले की तिन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी ही निवडणूक चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करून चांगला संदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक कार्यकर्ता व मतदारांनी आम्हीच उमेदवार आहोत अशा भावनेने काम केले असल्याचे नमूद केले. विशेष म्हणजे मंत्री बाबासाहेब पाटील, पंकजाताई मुंढे, आमदार सर्वश्री राणा जगजीतसिंह पाटील, संजय बनसोडे, सुरेश धस, धनंजय मुंढे, अक्षय क्षीरसागर यांच्यासह अमरसिंह पंडित यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या आजी-माजी आमदार खासदार लोकप्रतिनिधी मतदार व पदाधिकाऱ्यांनी ही नियोजन करून हा विजय संपादन केला त्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले. बीड जिल्ह्याला मुजरा करतो तर धाराशिव हा जिल्हा प्रेम करणारा असून जिल्हा परिषदेमध्ये माझी जडणघडण झाली आमदार राणाजगजितसिंह पाटील व सर्व सहकाऱ्यांनी मला सहकार्य केले त्याबरोबरच लातूरचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले एक वेगळाच आनंद मिळाला व तेथील लोकांनी मला समजून घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. सध्या मराठवाड्यात विकासाचे वारे वाहत असून विकासाची केंद्र, राज्य, जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत ही साखळी मजबूत झाले पाहिजे व सर्व प्रश्न सुटले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे मला राजयोग तर आहेच शिवाय निसर्गाची साथ सुद्धा मिळालेली असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे आमदार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली त्यामध्ये मला पराभव पत्करावा लागला. तसेच मी विरोधी पक्षात असताना सुरेश धस यांना आमदार केले. तर आता आम्ही तिघेही आमदार झालो असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितानी टाळ्यांचा कडकडाट प्रतिसाद दिला. भाजप महायुतीची मला उमेदवारी मिळणे ही मी माझे भाग्य समजतो आता माझी जबाबदारी अधिक वाढलेली असून आज पर्यंत माझ्या हातून चूक होऊ दिली नाही भविष्यामध्ये तुमची मान उंचावेल असे काम करीन असे सांगत मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने केल्याशिवाय राहणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी रामचंद्र तिरुके, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे यांनी आपले विचार मांडले. प्रस्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस ऍड नितीन भोसले यांनी तर उपस्थितांचे आभार ऍड अनिल काळे यांनी मानले. यावेळी भाजप महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……….
सुजितसिंह ठाकूर म्हणाले की, महा विकास आघाडीच्या एका नेत्याचा मला फोन आला, तुम्हाला आमच्या उमेदवाराला भेटायचे आहे. तुमचे आशीर्वाद आमच्या उमेदवाराला द्यावेत, असे त्या नेत्याने सांगितले. त्यावर मी त्यांना नकार दिला असे सांगत ते म्हणाले की, या निवडणुकीमध्ये लातूरच्या देशमुख यांना उमेदवारी मिळाली असती तर खरी लढत झाली असती असे सांगत ते म्हणाले की, पडायला सर्वसामान्य उमेदवार व विजयी व्हायला तुम्ही का ? असा प्रश्न नाव न घेता काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांना त्यांनी विचारला. बसवराज पाटील यांनी महायुतीच्या मतापेक्षा खूप अधिक मते घेऊन विक्रम केला आहे. मराठवाड्याच्या हक्काचे मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे १६.६६ टीएमसी हक्काचे पाणी आणण्यासाठी पाटील यांनी सभागृहात आवाज उठवावा अशी मागणी त्यांनी केली. बसवराज पाटील यांना ही मते मिळाली असली तरी ती माहितीतील नेत्यामुळे नव्हे तर बसवराज पाटील यांच्यामुळे ते विक्रमी मताधिक्य मिळाले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. भाजप हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा असून सामान्य कार्यकर्ता मोठा होण्याचे काम भाजप करीत आहे. त्यामुळे नवा जुना असा वाद फोन करीत असेल तर त्याला बाजूला टाकण्याचे काम या पक्षात केले जात असल्याचे सांगत ते म्हणाले की, बसवराज पाटील यांच्या रूपाने आपल्याला विकासा भूमिक नेता लाभला असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे बसवराज पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शत प्रतिशत भाजप होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!