वटवृक्ष मंदीरात “गुरु एक जगी त्राता” गायन सेवा संपन्न.

HTML img Tag
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.२०/०६/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या सौजन्याने दत्त संप्रदाय व गुरु संप्रदायावर आधारित गुरु एक जगी त्राता हा सांगितिक कार्यक्रम मंदीरातील ज्योतीबा मंडपात नुकतच मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला. दि. १६ जून रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत संपन्न झालेल्या या गायन सेवा कार्यक्रमात प्रसिद्ध गायक धनंजय म्हसकर, केतकी चैतन्य आणि ॐकार प्रभुघाटे यांनी आपल्या सुरेल आवाजाने स्वामींच्या भक्ती गीतांनी रंग भरले.
या गायन सेवेत त्यांना संवादिनीवर हर्षल काटदरे, तबल्यावर प्रसाद पाध्ये, पखवाजवर हनुमंत रावडे आणि तालवाद्यावर वेदश्री रावडे यांनी साथसंगत केली. अनघा मोडक यांनी आपल्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे निरूपण केले. हा कार्यक्रम ऑटस् वेल्थ आणि रुद्र एन्टरप्रायझेस यांच्या सहकार्याने सादर करण्यात आला.
यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे यांच्या उपस्थितीत चेअरमन महेश इंगळे यांनी सर्व मान्यवर कलाकारांचा स्वामी कृपा प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी सोलापूर सुवर्ण स्पोर्ट्स अकादमी चे प्रमुख चन्नेश इंडी, श्रीशैल गवंडी, प्रा. शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, काशिनाथ इंडे, स्वामीनाथ लोणारी, रविराव महींद्रकर आदींसह उपस्थित
स्वामी भक्तांनी या भक्तीमय संगीत
आणि गायन सेवेचा लाभ घेतला.
फोटो ओळ – देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात गायन सेवा सादर करताना कलाकार व सर्व कलाकारांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, चन्नेश इंडी व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!