गावगाथा

ऊस वाहतूक व्यवहारात पारदर्शकता आणणारे ‘Gangmen App’ ; शेतकरी, मुकादम, वाहन मालक आणि साखर कारखान्यांना एकाच व्यासपीठावर आणणारा नवा उपक्रम

शेती विषयक

ऊस वाहतूक व्यवहारात पारदर्शकता आणणारे ‘Gangmen App’ ; शेतकरी, मुकादम, वाहन मालक आणि साखर कारखान्यांना एकाच व्यासपीठावर आणणारा नवा उपक्रम

HTML img Tag Simply Easy Learning    


प्रतिनिधी : ऊसतोडणी व ऊस वाहतूक क्षेत्रात अनेकदा बनावट नोंदणी, अपारदर्शक व्यवहार, देयकांमध्ये होणारा विलंब, वाहन व टोळीबाबतची अपूर्ण माहिती यामुळे शेतकरी, मुकादम, वाहन मालक आणि साखर कारखाने यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ‘Gangmen App’ हे डिजिटल व्यासपीठ विकसित करण्यात आले असून, ऊस उद्योगातील सर्व घटकांना विश्वासार्ह, सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून देण्याचा या अॅपचा उद्देश आहे.
या अॅपद्वारे शेतकरी, टोळी मुकादम, ट्रक व ट्रॅक्टर मालक तसेच साखर कारखाने यांना एकाच प्लॅटफॉर्मवर जोडण्यात येणार आहे. व्यवहारातील पारदर्शकता वाढवून फसवणुकीच्या घटनांना आळा घालणे, खरेदी-विक्री व वाहतुकीशी संबंधित माहितीची खातरजमा करणे आणि सुरक्षित पेमेंट प्रणाली उपलब्ध करून देणे हे या अॅपचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
अॅपमध्ये नोंदणी केलेल्या वापरकर्त्यांची माहिती पडताळून घेतली जाते. त्यामुळे बनावट व्यवहार किंवा चुकीची माहिती देण्याचे प्रकार कमी होण्यास मदत होणार आहे. वाहनांची सत्यापित माहिती, टोळी व मुकादमांची नोंद, कारखान्यांशी थेट संपर्क, तसेच वेळेवर आणि खात्रीशीर देयके यामुळे संबंधित सर्व घटकांमध्ये परस्पर विश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
‘Gangmen App’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य वाहतूक व्यवस्था, मुकादमांना विश्वासार्ह वाहन मालक, वाहन मालकांना निश्चित काम आणि साखर कारखान्यांना अधिक सुव्यवस्थित व्यवस्थापनाचा लाभ मिळणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उद्योगातील व्यवहार अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि सुरक्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे अॅपच्या प्रचार साहित्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
अॅपचे प्रवर्तकांनी ऊस उद्योगाशी संबंधित सर्व घटकांनी या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा व सुरक्षित, विश्वासार्ह आणि फायद्याच्या व्यवहारांची नवी साखळी निर्माण करावी, असे आवाहन केले आहे.
Gangmen App ची प्रमुख वैशिष्ट्ये :
खरे व पडताळणी केलेले वापरकर्ते
पारदर्शक व सुरक्षित व्यवहार
वेळेवर आणि खात्रीशीर पेमेंट
वाहन, टोळी व कारखान्यांची सत्यापित माहिती
शेतकरी, वाहन मालक, मुकादम व कारखाने यांच्यात थेट संपर्क
फसवणूक रोखण्यासाठी डिजिटल पडताळणी व्यवस्था
विश्वास, पारदर्शकता आणि प्रगती यांना चालना
ऊस उद्योगात डिजिटल परिवर्तन घडवून आणत फसवणुकीला आळा घालण्याच्या दिशेने ‘Gangmen App’ हे एक महत्त्वाचे पाऊल ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button