गावगाथा

स्वामींच्या आशीर्वादाने मला जनसेवेसाठी नवीन ऊर्जा मिळाली – आमदार विक्रम काकडे

आमदार विक्रम काकडे यांचा चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.

स्वामींच्या आशीर्वादाने मला जनसेवेसाठी नवीन ऊर्जा मिळाली – आमदार विक्रम काकडे

विधानपरिषदेचे नूतन आमदार विक्रम काकडे यांनी घेतले श्री स्वामी समर्थाचे दर्शन.

आमदार विक्रम काकडे यांचा चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.१३/०६/२६)
स्वामींच्या आशीर्वादाने मला जनसेवेसाठी नवीन ऊर्जा मिळाली असल्याचे मनोगत विधानपरिषदचे नूतन आमदार विक्रम काकडे यांनी व्यक्त केले. आज आमदार विक्रम काकडे यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी देवस्थानच्या वतीने देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार विक्रम काकडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी आमदार विक्रम काकडे बोलत होते.
पुढे बोलताना आमदार काकडे यांनी स्वामींच्या शिकवणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे जनसेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगीतले. मंदीर समितीच्या वतीने येथे करण्यात आलेल्या सन्मानाबद्दल चेअरमन महेश इंगळे यांचे आभार मानले. यावेळी उपस्थित वडगाव शेरी खराडी पुणे मतदारसंघाचे मंडल अध्यक्ष सागर भाऊ काळे, राहुल काळे, शरद रामथीथकर, संतराम मोरे, उस्मान मुजावर, अर्जुन काळे, अभिजित काळे, लक्ष्मण केगार, राहुल सुधाकर काळे, अमोल कोळी यांचाही मंदीर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी सत्कार केला. या प्रसंगी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – विधानपरिषदेचे नूतन आमदार विक्रम काकडे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button