गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या विकासकामांमुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्राला नवी गती – उद्योगमंत्री उदय सामंत

अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या विकासकामांमुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्राला नवी गती – उद्योगमंत्री उदय सामंत
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासामार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी काढले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला सदिच्छा भेट दिली. यावेळी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा श्री स्वामी समर्थांची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची रेखीव प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी खासदार ज्योतीताई वाघमारे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेना (शिंदे गट) महानगरपालिका नगरसेवक अमोल बापू शिंदे, प्रियदर्शन साठे, महेश साठे, संजय पाटील, मनीष काळजे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, पुरोहित सोमकांत कुलकर्णी, निखील पाटील, प्रवीण घाटगे, बाळासाहेब पोळ, दत्ता मोरे, दत्ता माने, शुभम सावंत, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन अन्नछत्र मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या सेवा व विकास उपक्रमांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button