गावगाथा

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मुरलीधर मंदिर भक्त निवासाच्या चौथ्या मजल्याच्या स्लॅबचे पूजन संपन्न

मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते झाले पूजन

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मुरलीधर मंदिर भक्त निवासाच्या चौथ्या मजल्याच्या स्लॅबचे पूजन संपन्न
मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते झाले पूजन
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.०८/०७/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित मुरलीधर मंदिर भक्त निवास इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या स्लॅबचे पूजन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात करण्यात आले. यावेळी
चेअरमन महेश इंगळे म्हणाले की स्वामींच्या कृपेने भक्त निवासाचा हा विस्तार लवकर पूर्ण होऊन दूरदूरहून येणाऱ्या भक्तांना मंदीर परिसरात लवकरात चांगली सोय मिळेल.भक्तांच्या वाढत्या संख्येला लक्षात घेऊन भक्त निवासाचा विस्तार करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. देवस्थान समिती नेहमीच भक्तांच्या उत्कॄष्ट सेवेसाठी कटिबद्ध आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, अभियंता नवनाथ बनकर, सुनील नायकोडी, यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त, अभियंते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्लॅब पूजनानंतर सर्व उपस्थितांनी स्वामींच्या दर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button