इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन
देवस्थानच्या विकासकामांचे केले कौतुक
चेअरमन महेश इंगळे यांनी केला खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.११/०७/२६)
इचलकरंजीचे खासदार माननीय धैर्यशील माने यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी
मंदिर समितीचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले की देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी उपलब्ध असलेली निवास व्यवस्था स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि रुग्णालय, गोशाळा, तंत्र निकेतन महाविद्यालय, वस्तीगृह या सेवा खुपच उच्च दर्जाच्या आहेत. चेअरमन महेश इंगळे आणि त्यांच्या समितीने केलेली कामे कौतुकास्पद आहेत. भाविकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत तसेच अक्कलकोट आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेना नेते अमर रतिकांत पाटील साहेब देवस्थानचे आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, तुषार मोरे, रमेश शिंदे सर, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, मनोज जाधव, विपूल जाधव, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे, सिध्दाराम
कुंभार आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – खासदार धैर्यशील माने यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!