गावगाथा

मा.शरद पवार व डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते दानशूर बसलिंगप्पा खेडगी यांचा गौरव.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार व पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते दानशूर बसलिंगप्पा खेडगी व पवित्रा खेडगी यांचा पुरस्काराने गौरविण्यात आले

मा.शरद पवार व डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते दानशूर बसलिंगप्पा खेडगी यांचा गौरव.

अक्कलकोट, दि. ६ – शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने योगदान देणारे अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा दानशूर व्यक्तिमत्त्व बसलिंगप्पा खेडगी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि के. एल. ई. सोसायटीचे चेअरमन तथा पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी बसलिंगप्पा खेडगी व त्यांच्या धर्मपत्नी पवित्रा खेडगी यांना स्मृतिचिन्ह, शाल आणि पुणेरी पगडी देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील बिबवेवाडी परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात लिंगायत संघर्ष समिती आणि वीरशैव लिंगायत इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने कर्नाटकातून महाराष्ट्रात स्थलांतरित होऊन लिंगायत समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दहा मान्यवरांना पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. याच सोहळ्यात शिक्षण व समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत बसलिंगप्पा खेडगी व पवित्रा खेडगी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास ह.भ.प. गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार दिलीप सोपल, आमदार गणेश हुक्केरी, आशाताई कोरे, वीरशैव लिंगायत इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे तसेच लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील रुकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वीरशैव लिंगायत इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.
पवार आणि कोरे यांनी खेडगी यांच्या शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना बसलिंगप्पा खेडगी म्हणाले, हा सन्मान केवळ माझा वैयक्तिक गौरव नसून शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचा व हितचिंतकांचा सन्मान आहे. समाजाच्या उन्नतीसाठी अधिक जबाबदारीने आणि निष्ठेने कार्य करण्याची प्रेरणा या गौरवातून मिळाली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, अॅड. अनिल मंगरुळे, मंगेश चिवटे, सुधीर माळशेट्टी, धोंडप्पा नंदे, प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, उपप्राचार्य वैदेही वैद्य, वैशाली कलशेट्टी, प्रा. निलप्पा भरमशेट्टी, प्रा. जयश्री बिराजदार, डॉ. गणपतराव कलशेट्टी, डॉ. चौडप्पा आणेकर, प्रा. सिद्धाराम पाटील, डॉ. अभिजित धोत्रे, डॉ. विठ्ठल ढाले, प्रा. श्रीकांत जिड्डीमनी, प्रा. श्रीमंत बुक्कानुरे, प्रा. प्रकाश सुरवसे, विरुपाक्ष कुंभार, सातप्पा प्रचंडे, सिध्दाराम अरबाळे, संघटनेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने वीरशैव लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गुरव यांनी केले, तर प्रदीप साखरे यांनी आभार मानले.
कोट :
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते झालेला हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. हा गौरव समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची नवी ऊर्जा देणारा आहे.
— बसलिंगप्पा खेडगी
चेअरमन.
फोटो ओळ :
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार व पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते दानशूर बसलिंगप्पा खेडगी व पवित्रा खेडगी यांचा पुरस्काराने गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button