गावगाथा

शुभम आदटराव यांच्या वतीने श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मोफत पंचमुखी रुद्राक्ष वाटप.

प्रत्येक भाविकापर्यंत हे रुद्राक्ष मोफत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे.

शुभम आदटराव यांच्या वतीने श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मोफत पंचमुखी रुद्राक्ष वाटप.
(श्रीशैल गवंडी, दि.०६/०९/२६.अ.कोट)
आज पहाटेच्या काकड आरती नंतर श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरामध्ये मोफत रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. श्री स्वामी रुद्राक्ष तर्फे भाविकांना मोफत पंचमुखी रुद्राक्षाचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम शुभम आदटराव आणि माहेश्वरी राजेंद्र मोरे यांच्या वतीने राबविण्यात आला. याकामी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
शुभम आदटराव यांनी संपूर्ण भारतभर मोफत पंचमुखी रुद्राक्ष वाटप करण्याचा संकल्प हाती घेतला असून या शुभ कार्याची सुरुवात येथील वटवृक्ष मंदिरातून झाली आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना शुभम आदटराव म्हणाले की श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आज वटवृक्ष मंदिरातून या सेवेला सुरुवात झाली याचा मला आनंद आहे. रुद्राक्ष हे भगवान शंकराचे प्रतीक आहे, ते धारण केल्याने मनाला शांती मिळते. प्रत्येक भाविकापर्यंत हे रुद्राक्ष मोफत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे. आता संपूर्ण भारतभर हा उपक्रम आम्ही राबवणार आहोत. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे साहेबांनी आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. स्वामींची सेवा हीच खरी सेवा आहे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, विपूल जाधव, गणेश इंगळे, महेश मस्कले आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात भाविकांना पंचमुखी रुद्राक्ष वाटप करताना शुभम आदटराव, माहेश्वरी मोरे व भाविक दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button