*अवकाश व संरक्षण क्षेत्रात मार्गक्रमण करा: सुहास शिरोडकर*
शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या फालके यांनी केले. गांधी बाल मदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

*अवकाश व संरक्षण क्षेत्रात मार्गक्रमण करा: सुहास शिरोडकर*


मुंबई:
विज्ञान प्रदर्शनातून हो बालवैज्ञानिकांनी प्रेरणा घेउन अवकाश व संरक्षण क्षेत्रात भरारी घ्यावी. भारतीय सण उत्सवांच्या मागे देखील विज्ञानच असून छोट्या छोट्या प्रयोगांतून शास्त्रज्ञ घडतात. असे प्रतिपादन चांद्रयान ३ च्या इजिन निर्मिती प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेले प्रमूख पाहुणे, गोदरेज एरोस्पेसचे मुख्य व्यवस्थापक सुहास शिरोडकर यांनी केले. कुर्ल्यातील गांधी बालमंदिर हायस्कूलमधील विभागीय विज्ञान प्रदर्शन स्थळी ते बोलत होते. विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातच फक्त विज्ञान नसून ते क्रिकेट, किचन, आजूबाजूच्या संपूर्ण सृष्टीतही व्यापलेले आहे. मुलांनी शिक्षकांना सतत प्रश्न विचारावेत, उत्तरांचा पाठपुरावा करावा असे होमी भाभा बाल वैज्ञानिक केंद्र व टीआयएफआर च्या वैज्ञानिक डॉ. मयूरी रेगे प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाल्या.
तीन दिवसीय विभागीय प्रदर्शनात उत्तर मुंबईच्या एल् विभागातून सर्व माध्यमाच्या सुमारें ९० शाळांनी सहभाग नोंदणी करुन ३२८ शैक्षणिक प्रतिकृती, प्रकल्प सादर केले आहेत. यात दिव्यांग विद्यार्थांनी देखील १४ प्रकल्प सादर केले आहेत. शाळेचे शिक्षक अवधूत चव्हाण, अमोल जागले, घनश्याम जोशी, विश्वनाथ पांचाळ यांनी उभारलेल्या चंद्रयान ३चे यशस्वी अवतरण दाखविणारी चलत प्रतिकृतीचे उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉ मुश्ताक शेख आणि उपस्थितांनी भरभरून कौतुक केले. लोकसंख्या शिक्षण, जल साक्षरता, प्रयोगशाळा परिचर, नेचर क्लब आणि विज्ञान मंच या स्वरूपाचे हे साहित्य पाहण्यासाठी परिसरातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची झुंबड उडाली आहे. प्रीमिअर शिक्षण मंडळाचे अधिकारी अतुल मोडक, उप निरीक्षक गणेश खाडे, सहाय्यक शिक्षण निरीक्षक संतोष कंठे यावेळी उपस्थित होते. उद्घाटन दिनाच्या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना जाधव आणि रत्नकांत विचारे यांनी केले तसेच समन्वयक व प्रबोधन कुर्ला शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या फालके यांनी केले. गांधी बाल मदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
