गावगाथा

सोन्नलगी पुरस्काराच्या माध्यमातून चाकोते परिवाराकडून गुणीजनांचा सन्मान – सुशीलकुमार शिंदे

पारंपारिक बाराबंदी, पगडी घालून, नंदीध्वज देवून सत्कार

सोन्नलगी पुरस्काराच्या माध्यमातून चाकोते परिवाराकडून गुणीजनांचा सन्मान – सुशीलकुमार शिंदे

पारंपारिक बाराबंदी, पगडी घालून, नंदीध्वज देवून सत्कार

सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूर आणि महाराष्ट्रात आपल्या कर्तुत्वाने आपली सिध्दता दाखवली अशा गुणीजणांना सन्मान सोन्नलगी पुरस्काराच्या माध्यमातून चाकोते परिवाराकडून करण्यात आला याचा आनंद वाटतो असे प्रतिपादन सोलापूरचे सुपुत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. तळे हिप्परगा येथील शॉवर अॅन्ड टॉवर वॉटर पार्कमध्ये झालेल्या सोन्नलगी पुरस्काराचे वितरण शुक्रवारी सायंकाळी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या शानदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीपीठाचे श्री श्री श्री 1008 जगदगुरू ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी होते.


आपल्या क्षेत्रात काम करताना समाजाला नवी दिशा देण्याचे काम करणाऱ्यांचा सन्मान करणे योग्यच आहे आणि सोलापूरमधील अशीच काही कर्तव्यतत्पर अधिकारी, पत्रकार, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांना निवडून त्यांच्या कामाला प्रतिष्ठा देण्याच्या दृष्टीने चाकोते परिवाराने सोन्नलगी पुरस्कार देवून गौरव केला आहे. ही परंपरा चांगली आहे आणि त्याची जोपासना माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केली त्याचा आनंद आहे असेही सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.


समाजात निस्वार्थ काम करून समाजाची सेवा करणाऱ्यांचा गौरव चाकोते परिवाराकडून करण्यात येतो, माजी आमदार बाबुराव चाकोते यांचा वारसा विश्वनाथ चाकोते आणि त्यांचे परिवाराने सुरू ठेवला आहे हे विशेष आहे. असे आर्शीवचन काशीपीठाचे जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी यांनी दिले.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले नंतर विश्वशंकर चाकोते यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बोलून सोलापूरमध्ये अनेक गुणवंत आहेत त्यांचा उपयोग सोलापूरच्या विकासासाठी व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याचे विश्वशंकर चाकोते यांनी सांगितले. सोलापूरच्या विकासासाठी माजी आमदार बाबुराव चाकोते आणि सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळेच सोलापूरला आज पिण्याचे पाणी मिळत आहे. उजनी ते सोलापूर पहिली पाईपलाईन शिंदे साहेबांनी आणली आता लोकसंख्या वाढत असल्याने पुन्हा दुसऱ्या पाईपलाईनसाठीही निधीची तरतूद शिंदे साहेबांनी केली आहे. हे व्हिजन असलेले सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच सोलापूरचा विकास झाला आहे असे माजी आमदार, माजी महापौर विश्वनाथ चाकोते यांनी सांगितले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.


श्री रामलिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व क्रिडा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सोन्नलगी रत्न पुरस्कार उद्योगपती प्रेमरतन दमाणी यांना देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button