*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामुळे श्रीक्षेत्र अक्कलकोटला विकासाची दिशा मिळाली — संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे*
सत्कार

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामुळे श्रीक्षेत्र अक्कलकोटला विकासाची दिशा मिळाली — संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे*

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासकडून श्रीक्षेत्र अक्कलकोटला विकासाची दिशा मिळाली असल्याचे मनोगत संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले.*

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमर पाटील, सुनील कटारे, सातलिंग स्वामी, आनंद बुक्कानवरे, योगीराज पाटील, राजू बिराजदार आदीजन उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, शिवकुमार स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगाणुरे, दत्ता माने, निखिल पाटील, प्रसाद हुल्ले, गोटू माने, प्रविण घाडगे, सुमित कल्याणी, मल्लिकार्जुन बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
