गावगाथा

बसवभूमी बसवकल्याण येथून बसवज्योती यात्रा कर्नाटक राज्यातील बिदर बसवकल्याण मार्गे महाराष्ट्रात सोलापूर,पुणे, मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार

महात्मा बसवेश्वर,महात्मा गांधी,नेल्सन मंडेला यांचे विचार तत्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद 8 व 9 जून रोजी दक्षिण आफ्रिकेत पीटरबर्ग फोनेक्स या शहरात होणार होणार असल्याची माहिती परम पूज्य जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी यांनी आज पत्रकार परिषद दिली.

बसवभूमी बसवकल्याण येथून बसवज्योती यात्रा कर्नाटक राज्यातील बिदर बसवकल्याण मार्गे महाराष्ट्रात सोलापूर,पुणे, मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार

सोलापूर – बसव तत्वांचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा. याकरिता बसवभूमी बसवकल्याण येथून बसवज्योती यात्रा कर्नाटक राज्यातील बिदर बसवकल्याण मार्गे महाराष्ट्रात सोलापूर,पुणे, मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार आहे.महात्मा बसवेश्वर,महात्मा गांधी,नेल्सन मंडेला यांचे विचार तत्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद 8 व 9 जून रोजी दक्षिण आफ्रिकेत पीटरबर्ग फोनेक्स या शहरात होणार होणार असल्याची माहिती परम पूज्य जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी यांनी आज पत्रकार परिषद दिली.

गुरुबसवा फाऊंडेशन हैदराबाद, कल्याण कर्नाटक फाउंडेशन बिदर. चेन्नबसवेश्वर ज्ञानपीठ कुंबळगोडा बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या परिषदेसाठी सोलापूर येथील किरीटेश्वर मठाचे प.पू. स्वामीनाथ स्वामीजी व जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री थळंगे, लिंगायत समन्वय समिती सकलेश बाबुळगावकर यांनी बसव ज्योती यात्रेला शुभेच्छा दिल्या.

जगद्गुरु चन्न बसवानंद महास्वामीजी म्हणाले,महात्मा गांधींनी नेल्सन मंडेला यांना प्रेरणा दिली, विश्वगुरू बसवण्णा यांनी गांधींना प्रेरणा दिली. जगाला बसवण्णा, बसव तत्वाची गरज आहे, जी सर्वांना प्रिय आहे. जगातील विविध देशांमध्ये परिषदा आयोजित करून बसव तत्त्वज्ञानाचा प्रसार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधी यांच्या नाती गांधी फाउंडेशन चे अध्यक्ष ईला गांधी स्वागत करणार आहेत.

बसवण्णांचे शब्द प्रकाशासारखे आहेत. अज्ञान, अंधकार, अन्याय यांचे निर्मूलन, सर्वत्र समतेचा समरस समाज घडविण्याचे व्रत मनात पेरण्याचे काम सर्वत्र झाले पाहिजे. साहित्याबरोबरच बसवांचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची आशा आहे.
बसवकुमार पाटील अध्यक्ष कल्याण कर्नाटक प्रतिष्ठान असा आशावाद व्यक्त केले.

बसव तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दक्षिण आफ्रिकेत आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केल्याचा आनंद आहे. बसवण्णांच्या तत्त्वांचा आणि संदेशांचा विविध देशांमध्ये परिचय करून देण्यासाठी अशा परिषदा उपयुक्त ठरतात. असे मत विजयकुमार हत्तुरे यांनी मांडले.
या पत्रकार परिषदेस बसवकुमार पाटील, विजयकुमार हत्तुरे, नागनाथ पाटील, शिवानंद गोगाव, सकलेश बाबुलगावकर, राजश्री थलांगे, शिवराज कोटगी, विजयकुमार बावी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button