गावगाथा

अक्कलकोट आषाढी यात्रेनिमित्त रविवारी अमावास्या दिवशी श्री लक्ष्मी देवीची विधिवत पूजा नदीचे नवे पाणी भरलेले कलश घेऊन महिलांनी चौडेश्वरी, लक्ष्मी व मरीआई देवीला अर्पण ….

धार्मिक कार्यक्रम

अक्कलकोट आषाढी यात्रेनिमित्त रविवारी अमावास्या दिवशी श्री लक्ष्मी देवीची विधिवत पूजा नदीचे नवे पाणी भरलेले कलश घेऊन महिलांनी चौडेश्वरी, लक्ष्मी व मरीआई देवीला अर्पण ….

अक्कलकोट, दि. ४-
आषाढ महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी आणि रविवारी अमावास्या दिवशी शहरांतील पेठापेठांमध्ये गल्ली जत्रांना जोर आला होता. नदीचे नवे पाणी भरलेले कलश घेऊन महिलांनी चौडेश्वरी, लक्ष्मी व मरीआई देवीला अर्पण केले. हलगी वाद्याच्या तालावर काढण्यात आलेल्या नव्या पाण्याच्या मिरवणुकांनी आषाढातील शेवटचा शुक्रवार आणि रविवार गल्ली यात्रेने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर पुरणपोळी व खिरीचे महाप्रसाद वाटप व घेण्यासाठी पेठांतील मंदिरात एकच झुंबड उडाली होती.

बासलेगांव रस्त्यावरील साई समर्थ नगर मधील श्री लक्ष्मी मंदिरात उत्साहाचे वातावरण होते. आषाढ महिना समाप्ती व लक्ष्मी जत्रामुळे शहरातील वातावरण मंगलमय झाले होते. ५ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात अनेकजण मांसाहार वर्ज्य करतात, त्यामुळे आषाढ महिन्यात यात्रा व जत्रा नव्या पाण्याच्या यात्रेच्या निमित्ताने अक्कलकोट शहरात गल्लीमध्ये यात्रा साजऱ्या केल्या जातात. शुक्रवार व रविवार सकाळपासूनच नदीतून नवे पाणी आणण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती. फुलांनी सजवलेल्या कलशात नवे पाणी भरून गल्लीतील रहिवासी बेडर गल्ली येथील मरीआई मंदिरात गेले. यावेळी गुलाल उधळण केली. मरीआई देवीला नवे पाणी अर्पण करण्याची प्रथा पार पाडत अक्कलकोटकरांनी आषाढी
यात्रा साजरी केली.
आषाढातील गल्ली जत्रेचा सध्या माहौलची सांगता झाली आहे. वर्गणी काढून व दानशूर व्यक्तींनी गल्ली व पेठांतील श्री मंदिरात नियोजन सुरू होते. या जत्रेत अख्खी गल्ली सहभागी होत असल्याने मोठ्या प्रमाणात खिरीचे महाप्रसाद वाटप करण्यात आले.

बासलेगांव रस्त्यावरील श्री लक्ष्मी मंदिरात पहाटे अभिषेक व महापूजा करण्यात आले. त्यानंतर विविध वस्तीच्या मार्गावरुन
सवाद्य मिरवणूक काढण्यात आले. जुन्या काळातील लक्ष्मी मंदिरात विधीवत पूजा व आरती करुन मिरवणूक ची सांगता करण्यात आले. मिरवणुकीत हलगी वाद्य, फटाक्यांची आतिषबाजी व श्री लक्ष्मी माता की जय च्या जयजयकाराने सारे वातावरण मंगलमय झाले होते. शेवटी हजारो भाविकांना खिरीचा महाप्रसाद वाटप करण्यात आले. येथील मंदिरात भाविकांना पिण्याच्या पाण्याची व महाप्रसाद वाटप ची व्यवस्था चोख केल्याने मालिकांतून समाधान व्यक्त होत होती.

या सोहळ्यास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, देवस्थानचे प्रमुख बाबुराव विभूते, अनिल विभूते, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी,
केरबा होटकर, नागराज कुंभार, नन्नू कोरबू, मनोज निकम, अभिषेक लोकापूरे,माजी सैनिक अनिल हत्ते, चंद्रकांत दसले, दिगंबर साळुंके, बसवराज आगरखेड, चंद्रकांत पाटील, विजयकुमार हौदे, प्रशांत गुरव, रमेश शिंदे, मल्लिकार्जुन सोमेश्वर, दिलीप कुंभार, गुरु दुर्गे, शेखर उंबराणीकर, बसवराज शिवगुंडे, विरुपाक्ष कुंभार, विष्णुदास सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट —
सालंकृत पूजा

आषाढी यात्रेनिमित्त रविवारी अमावास्या दिवशी श्री लक्ष्मी देवीची विधिवत पूजा करण्यात आली होती. सकाळी देवीला अभिषेक करण्यात आला. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी पोतराजांनी चाबकाने विविध प्रकारच्या खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.त्यानंतर हजारो भाविकांना खिरीचा महाप्रसाद वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button