वागदरी येथील माजी सरपंच रविकिरण वरनाळे, पत्रकार धोंडपा नंदे व जि.प शिक्षक नितीन हिरके यांना”बसवरत्न” पुरस्काराने सन्मान..
बसव प्रतिष्ठान उपक्रम

वागदरी येथील माजी सरपंच रविकिरण वरनाळे, पत्रकार धोंडपा नंदे व जि.प शिक्षक नितीन हिरके यांना”बसवरत्न” पुरस्काराने सन्मान..

वागदरी –मुरुम येथील बसव प्रतिष्ठान अखिल भारतीय सामाजिक संघटनेकडून महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या औचित्याने राज्यभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय “बसवरत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात वागदरी येथील माजी सरपंच रविकिरण वनाळे आदर्श राजकीय व्यक्तिमत्व, पत्रकार धोंडाप्पा नंदे यांना आदर्श पत्रकार व भुरिकवठे येथील जि.प.शिक्षक नितीन हिरके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शहरातील मंगल कार्यालयात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील होते.याप्रसंगी अफजलपूर येथील हिरेमठ संस्थानचे मठाधिपती मळेंद्र शिवाचार्य,केसरजवळगा विरक्त मठाचे विरंतेश्वर महास्वामी,डी आय गायकवाड,उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते,माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभरातील 20 व्यक्तींना शैक्षणिक,सामाजिक,आरोग्य, क्रिडा,कृषी,पत्रकारिता यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते “जीवन गौरव” तसेच “बसवरत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर,छत्रपती संभाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले.बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ रामलिंग पुराणे यांनी कार्यक्रमाचे प्रस्थाविक केले.सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड यांनी आभार मानले.कार्यक्रमाला मुरूम शहर व परिसरातील नागरिक,महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त मान्यवर
डी आय गायकवाड,सचिन वाघमारे,कलप्पा पाटील,बसवराज बालुरे,नितीन हिरके,पत्रकार धोंडप्पा नंदे,रविकिरण वरनाळे,डॉ ज्ञानेश्वर माशाळर,केदार महामुनी,सौ तेजश्री महामुनी,गणेश खबोले,रोहित पाटील,भगत माळी,रमेशकुमार मिठारे,सदानंद मुतनाळे,महादेव शिनगारे,प्रा अण्णाराव कांबळे,प्रा सुभाष हुलपल्ले,चि आदर्श मंडले,कु लक्ष्मी गुंजोटे.
