गावगाथा

9 महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा ; अक्कलकोटच्या नवीन राजवाड्याच्या ऐतिहासिक वास्तूत योगदिन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त

9 महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा ; अक्कलकोटच्या नवीन राजवाड्याच्या ऐतिहासिक वास्तूत योगदिन

अक्कलकोट, ता. 21: अक्कलकोट येथील ऐतिहासिक नवीन राजवाड्याच्या प्रांगणात 9 महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या वतीने अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एकूण चार महाविद्यालयाच्या 350 विद्यार्थ्यांनी या योग दिन शिबिरात सहभाग नोंदवला. यावेळी अक्कलकोट संस्थानचे अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले,एनसीसी कमांडिंग ऑफिसर कर्नल रणधीर सतीश, श्री काशी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मल्लिकार्जुन पाटील, योग शिक्षक माणिक माशाळे, परमेश्वर गुरव आणि कस्तुरीताई गुरव तसेच प्रथमेश इंगळे शरणाप्पा संकपाळ अशोक पाटील राजशेखर चौधरी यांच्यासह संस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती होती. प्रारंभी योग गुरूंच्या प्रतिमेच्या पूजनानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर या तीनही योग शिक्षकांनी योग अभ्यासाचे आपल्या शरीर जीवनावर होणारे परिणाम आणि त्यातून होणारा आत्मिक आणि मानसिक लाभ याची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि योग अभ्यासाचे सर्व प्रकारचे धडे प्रात्यक्षिकासह करून दाखवून सर्व विद्यार्थ्याकडून ते करून घेतले. सकाळच्या सुंदर प्रहरी या योगाभ्यासाचे धडे घेऊन सर्व विद्यार्थी भारावून गेलेले दिसले. यावेळी संस्थांचे प्रमुख अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले म्हणाले आमच्या राजवाड्याच्या ऐतिहासिक वास्तूत योग दिनाच्या सुंदर असा उपक्रम साजरा करण्यात आला याचा मनस्वी खूप आनंद झाला आणि सर्व विद्यार्थ्यांनी ह्या घेतलेल्या योग अभ्यासाचे धडे दररोजच्या जीवनामध्ये अमलात आणून आपली शरीर प्रकृती चांगली आणि आनंदी राहील यासाठी सतत काळजी घ्यावी असे आवाहन केले. यावेळी बोलताना रणधीर सतीश म्हणाले अक्कलकोट संस्थानचे प्रमुख मालोजीराजे भोसले यांनी आमच्या 9 महाराष्ट्र एनसीसी बटालियन साठी योग अभ्यासासाठी त्यांचे प्रांगण उपलब्ध करून दिले आणि त्यासाठी सर्व सोयी सुविधा पुरवल्या आणि मोठ्या आनंदाने सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले याबद्दल आभार मानून सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले योग अभ्यासाचे धडे आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणून आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवावे असे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे संयोजन श्री समीर मनियार, श्री भैरप्पा कोणदे, श्री सचिन डफळे आणि श्री सोमनाथ जळकोटे या एनसीसीच्या स्थानिक शिक्षकांनी आणि राजवाड्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाच्या सांगता एनसीसी गीत आणि राष्ट्रगीताने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp Group