कल्याणशेट्टी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम..
तहसीलदार विनायक मगर यांची प्रमुख उपस्थिती

कल्याणशेट्टी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम..

तहसीलदार विनायक मगर यांची प्रमुख उपस्थिती

अक्कलकोट

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था,अक्कलकोट संचलित
मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी बोलताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन सनातनी लोकांची दहशत सहन करून मोठ्या धैर्याने मुलींना शिक्षण दिले म्हणून त्यांचा आदर्श महिलांनी घेतला पाहिजे. महिलांनी संकटाला सामोरे गेले पाहिजे, उच्च शिक्षण घेऊन निर्भीड झाले पाहिजे. आपले अंगभूत कौशल्य वापरून शौर्याने दुर्जनांचा सामना केला पाहिजे, तरच अभिनव समाजाची निर्मिती होईल.

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत मलकप्पा भरमशेट्टी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन प्राध्यापिका हर्षदा गायकवाड यांनी केले तर आभार प्रा राजशेखर पवार यांनी मानले.
चौकटीतील मजकूर
सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्री पुरुष समानता आली
सावित्रीबाई फुले यांच्या विचारानुसार महिलांनी परिवर्तन शील विचार स्वीकारले आहे. समाजात कृतिशील बदलाचे वारे वाहत आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता आली आहे. असे तहसीलदार विनायक मगर यांनी यावेळी सांगितले.
फोटो ओळ
मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी तहसीलदार विनायक मगर व मान्यवर.