*श्री संतसेना महाराज नाभिक समाज बहुउद्देशिय संस्था अक्कलकोट शहर संचलित श्री संतसेना महाराज यांची ६५४ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरा
पुण्यतिथी विशेष

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री संतसेना महाराज नाभिक समाज बहुउद्देशिय संस्था अक्कलकोट शहर संचलित श्री संतसेना महाराज यांची ६५४ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. श्री संतसेना महाराज की जय..! च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता.*
सालाबादप्रमाणे यंदाही श्री सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विणा पूजन व रघुनंदन भजनी मंडळ दहिटणे यांच्या भजन कार्यक्रम संपन्न झाला. गोरज मुहूर्तावर श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीचे पूजन व श्री हनुमान भजनी मंडळ बणजगोळ यांचा हरिजागर कार्यक्रम संपन्न झाला.

दरम्यान शिवराज हडपद यांच्या हस्ते सेना महाराजांची मूर्ती स्थापना करण्यात आली. सायंकाळी सात वाजता हनुमान भजनी मंडळ बणजगोळ यांचे हरी जागर कार्यक्रम संपन्न झाला. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ५१ जणांनी रक्तदान केले. श्री हनुमान भजनी मंडळ कुन्सावळी यांचा गुलालाचे कीर्तन, व गुलालाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमास माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, बहुजन वंचित आघाडीचे चंद्रशेखर मडीखांबे, बंटी राठोड, लाला राठोड, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी जमदाडे, सोनार समाजाचे प्रदेश अध्यक्ष्य रविकिरण धर्माधिकारी, खेमू राठोड, डॉ.सतिश बिराजदार, प्रथमेश इंगळे, उद्योजक सिद्धराम टाके, नन्नु कोरबु, ज्योती जरीपटके, दीपक जरीपटके यांच्यासह आदिजण प्रमुख उपस्थित होते. या उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

*⭕चौकट :*
*नाभिक समाज सभामंडपासाठी रु. २५ लाख :*
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सदर कार्यक्रमास भ्रमण ध्वनी द्वारे शुभ संदेशा प्रसंगी नाभिक समाजाच्या सभा मंडपासाठी २५ लाख रुपये निधीची घोषणा केल्याची माहिती श्री संतसेना महाराज नाभिक समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुदर्शन विभूते यांनी सांगितले.

याप्रसंगी शहर अध्यक्ष लक्ष्मण विभूते, उपाध्यक्ष राजेश कोरे, माजी तालुका व शहर अध्यक्ष अरुण विभूते, पद्माकर डीग्गे, प्रभाकर सुरवसे, भागवत विभूते, सोमनाथ सुरवसे, महादेव भाले, शरण सुरवसे, श्रीशैल सुरवसे, प्रशांत विभूते, प्रविण राऊत, नरसिंग क्षीरसागर, वेंकटेश विभूते, अनिल वाघमारे, शिवराज कोरे, सुमित डीग्गे, काशिनाथ विभूते, जगन्नाथ वाळके, दादा वाळके, हरी राऊत, संदीप राऊत, प्रवीण राऊत, महेश सुरवसे, अमर सुरवसे, आकाश सुरवसे, राजेंद्र सुरवसे, सचिन लोखंडे, शिवा विभूते, सचिन विभूते, संकेत विभूते, समर्थ विभूते व महिला तालुकाध्यक्षा अनुराधा सुरवसे, भाग्यश्री काळे, डॉ.प्रमिला वाघमारे, संध्या विभूते यांच्यासह वागदरी, मैंदर्गी, दुधनी, भुरीकवठे, शिरवळ या विविध गावातून नाभिक समाज बांधव बहुसंख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सुरवसे तर आभार शिवशरण सुरवसे यांनी मानले.
