*संविधानिक पद्धतीने विवाह करून रक्तदान शिबीर संपन्न*
सदर रक्तदान शिबिरासाठी श्रीमती देवकाबाई छेडा रक्तपेढी चे रक्तपेढी प्रमुख राजेंद्र चंद्रहास आणि त्यांचे सहकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

*संविधानिक पद्धतीने विवाह करून रक्तदान शिबीर संपन्न*

पालघर येथील अर्थीयन समाजिक संस्थेचे कार्यकर्ते चि निखिल घरत यांचा विवाह चि सौ कां मानिषा यांचेशी संविधानिक पद्धतीने साजरा करून एक सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने लग्नाच्या स्वागत समारंभामध्ये भव्य असे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी निखिल यांच्या मित्र परिवार, नातेवाईक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान करण्यात आले अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला समाजातील सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे सदर रक्तदान शिबिर राबविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पंकज वीरा, घरत आणि कोकनेर परिवार आणि अर्थीयन कला संस्थेचे कार्यकर्ते , नातेवाईक यांनी पुढाकार घेतले व शिबीर यशस्वी केले।
सदर रक्तदान शिबिरासाठी श्रीमती देवकाबाई छेडा रक्तपेढी चे रक्तपेढी प्रमुख राजेंद्र चंद्रहास आणि त्यांचे सहकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.