अनंत चैतन्य माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, हन्नूर ला ” जिल्हास्तरीय कृतीशील शाळा पुरस्कार “–
पुरस्कार सन्मान

अनंत चैतन्य माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, हन्नूर ला
” जिल्हास्तरीय कृतीशील शाळा पुरस्कार “—–
—————————————-
अनुदानित,अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शैक्षणिक संस्था, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध मागण्या, प्रलंबित प्रश्नांचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करणारे पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत सर यांच्या संकल्पनेतून साकारलेला यंदाचा मानाचा जिल्हास्तरीय कृतीशील शाळा पुरस्कार महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था ,अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय हन्नूर ला प्राप्त झाला.काल शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर येथे पार पडलेल्या ” कृतीशील पुरस्कार सोहळा ” दरम्यान महाराष्ट्र राज्य कृती समिती चे संस्थापक व माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत सर यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे सर यांना गौरवण्यात आले. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.ज्ञानदेव शिंदे, जेष्ठ शिक्षक शहाजी माने, अप्पासाहेब काळे, धनंजय जोजन, सुरेश जाधव, शशी अंकलगे, प्रा. काशीनाथ पाटील, रमेश शिंदे, अब्दुल अजीज मुल्ला, शिक्षिका सौ. मृदुलादेवी स्वामी, प्रयोगशाळा सहायक श्री. स्वामीनाथ कोरे, ग्रंथपाल श्री. काशीनाथ हताळे, सेवक श्री. शिवप्पा घोडके उपस्थित होते.प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे यांनी या सोहळ्याप्रसंगी प्रशालेला ” कृतीशील शाळा पुरस्काराने” सन्मानित केल्याबद्दल माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत सर, समितीचे जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ वांगीकर व समन्वयक श्री. परमेश्वर होसूरे यांचे आभार मानले. या पुरस्काराबद्दल मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व समस्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष व आमदार मा. सचिन दादा कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक आदरणीय श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारवड श्री. सिध्देश्वर कल्याणशेट्टी, संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, हन्नूरगावचे उपसरपंच व युवा नेते मा. सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती,शिक्षण विभाग प्रमुख सौ. रूपाली शहा मॅडम, विज्ञान विभाग प्रमुख श्री. सौ. पुनम कोकळगी मॅडम यांनी अभिनंदन केले.
