नीलकंठेश्वर फाऊंडेशन आयोजित लकी ड्रॉ महेश इंगळेंच्या हस्ते वितरण
नीलकंठेश्वर सोशल फाऊंडेशनच्या लकी ड्रॉ साहित्यांचे पूजन प्रसंगी महेश इंगळे व अन्य तर दुसऱ्या छायाचित्रात बालाजी मुटकिरे यांनी महेश इंगळे यांचा सत्कार करतानाचे प्रसंग.

नीलकंठेश्वर फाऊंडेशन आयोजित लकी ड्रॉ महेश इंगळेंच्या हस्ते वितरण


(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१४/९/२३) सोलापूरच्या साखर पेठेतील नीलकंठेश्वर मंदिर व नीलकंठेश्वर सोशल फाऊंडेशन जानराव समाजाच्या वतीने भव्य वार्षिक लकी ड्रॉ सोडतीचे वितरण मोठ्या थाटात संपन्न झाला. याप्रसंगी निलकंठेश्वर सोशल फाऊंडेशनच्या वतीने ड्राॅ साठी ठेवलेल्या दोन सायकल व दोन शिलाई मशीनचे पुजन व बक्षीस वितरण येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संध्याकाळी महेश इंगळे यांनी येथील श्री निलकंठेश्वर मंदिरात सदिच्छा भेट देऊन महादेवाची आरती करून दर्शन घेतले. याप्रसंगी ज्ञातीसंस्था कार्यालयात जानराव समाजाचे अध्यक्ष बालाजी मुटकिरी यांनी महेश इंगळे व प्रथमेश इंगळेंचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी श्रीनिवास बंदगी यांच्या हस्ते सोलापुरी चादर तर, महेश धुळम यांच्या वतीने सोलापूरी टाॅवेल भेट देण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी जानराव समाजाचे व नीलकंठेश्वर फाऊंडेशनचे हे कार्य निस्वार्थी व सेवाभावी तत्त्वावर चालले असल्याचे पाहून अत्यंत समाधान वाटले. समाजाच्या तळागाळातील नागरिकांचे हित डोळ्यांसमोर ठेवून यापुढेही विविध समाजाभिमुख उपक्रम राबवित नीलकंठेश्वर फाऊंडेशन सदैव कार्यमग्न राहावे याकरिता नीलकंठेश्वरच्या चरणी साकडे घातले असल्याचे मनोगत व्यक्त केले. श्री स्वामी समर्थ सुद्धा शंकराचे उपासक होते. त्यामुळे आज नीलकंठेश्वराची आरती केल्याने विशेष आनंद झाला असल्याचे मनोगतही इंगळे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त शंकर बटगिरी यांनी केले, तर समाजाचे अध्यक्ष बालाजी मुटकिरी यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी विश्वस्त चंद्रशेखर पोगुल यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी जानराव समाजाचे उपाध्यक्ष बालाजी येज्जा, सचिव सत्यनारायण द्यावरकोंडा, विश्वस्त राजेंद्र द्यावरकोंडा, हिरालाल धुळम, अंबादास नादरगी, प्रकाश टंकसाळ, नागेश टंकसाळ, शंकर बटगिरी, श्रीनिवास बंदगी, राजु कामुर्ती, जेष्ठ समाज बांधव सुदर्शन मादगुंडी, सोशल फाऊंडेशनचे सुनिल धुळम, लखन रुमांडला, नरसिंग म्हंता, अनिल मादगुंडी, लखन मिठ्ठा, शिवराज धुळम, रमेश म्हंताटी
आदीसह समाज बांधव, बंधू भगिनी उपस्थित होते.

फोटो ओळ – नीलकंठेश्वर सोशल फाऊंडेशनच्या लकी ड्रॉ साहित्यांचे पूजन प्रसंगी महेश इंगळे व अन्य तर दुसऱ्या छायाचित्रात बालाजी मुटकिरे यांनी महेश इंगळे यांचा सत्कार करतानाचे प्रसंग.
