अनंत चैतन्य प्रशालेत
” रक्षाबंधन उत्सव ”
आनंदमय वातावरणात साजरा —
————————————– “रक्षाबंधन हा भाऊ – बहिणींमधील अतूट प्रेम आणि आपुलकीचा सण आहे.या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते,जो तिच्या संरक्षणाचे वचन देतो. हे नातं केवळ रक्ताचं नसून विश्वास,प्रेम व निष्ठेचं प्रतीक आहे.असा हा रक्षाबंधनाचा पवित्र उत्सव आज महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय,हन्नूर येथे अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाला.
यावेळी प्रशालेतील पाचवी ते दहावी व कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी व बारावीच्या मुलींनी प्रशालेतील मुलांना राखी बांधल्या विशेष म्हणजे यातील बहुतांश राख्या ह्या मुलींनी स्वतः बनवल्या होत्या. यावेळी मुलांनीही आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून शालेय साहित्य भेटस्वरुपात दिले.यामुळे प्रशालेतील मुलां- मुलींमध्ये एकता,सौहार्द व सामाजिक बांधिलकीचे सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले.यासोबतच प्रशालेचे प्राचार्य श्री. अशोक साखरे, पर्यवेक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे व समस्त प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेत्तर बंधूनाही शिक्षिका भगिनींनी राखी बांधल्यांने या राखी पौर्णिमेच्या पवित्र उत्सवामधून बहीण- भावांमध्ये जपले जाणारे भावनिक नाते अधिकच दृढ झाले. सांस्कृतिक परंपरा समृद्ध करणारा हा रक्षाबंधनाचा स्तुत्य कार्यक्रम प्रशालेत साजरा केल्याने
संस्थेचे अध्यक्ष व आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, हन्नूरचे उपसरपंच व युवा नेते श्री. सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक श्री मल्लिकार्जुन मसुती,सी ई ओ सौ. रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी कौतुक केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!