गावगाथा

सोनार समाज गौरव सोहळा आणि शासकीय योजना शिबीराचे आयोजन

सामाजिक कार्यक्रम

सोनार समाज गौरव सोहळा आणि शासकीय योजना शिबीराचे आयोजन…

 

HTML img Tag Simply Easy Learning    
सोलापूर -महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत सोनार सुवर्णकार समाजाने आपल्या कला कुसरीने आणि प्रामाणिक पणाने नेहमीच एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बदलत्या जागतिकीकरणाच्या युगात केवळ कौशल्य असून चालत नाही. तर त्याला आधुनिकतेची विचारांची आणि सरकारी योजनांच्या पाठबळाची जोड मिळणे काळाची गरज बनली आहे. याच दृष्टीने सोलापूर येथे येत्या दि. २८ डिसेंबर रविवार रोजी सकाळी १० वाजता निर्मिती लॉन्स, विजयपूर रोड येथे आयोजित केलेला सोनार समाज गौरव सोहळा व शासकीय योजना माहिती शिबीर हा उपक्रम सोनार समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    
कर्तृत्वाचा सन्मान प्रेरणादायी सोहळा कोणताही समाज तेंव्हाच प्रगत होतो,जेंव्हा तो आपल्यातील गुणवंतांची कदर करतो. सोहळ्यात सामाजिक, शिक्षण, उद्योग, क्रीडा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात राज्यभरातून रातून निवडल्या गेलेल्या ५२ समाज भूषण, हिरकणी, आदर्श शिक्षक रत्न,, उद्योग रत्न, युवा उद्योग सुवर्णं रत्न, आदर्श माता पिता, पत्रकार यांचा गौरव केला जाणार आहे. हे केवळ सत्कार नसून, समाजातील नवीन पिढीसमोर ठेवलेले यशाचे आदर्श आहेत. हा पुरस्कार प्राप्त व्यक्ती समाजाच्या खऱ्या, ब्रँड ऍम्ब्यासिडर आहेत. शासकीय योजना-सक्षमीकरणाचा पाया आजच्या स्पर्धात्मक युगात सुवर्ण कारागीरांना भांडवल, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची गरज आहे. केंद्र सरकारची पी. एम. विश्वकर्मा योजना, मुद्रा कर्ज योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, राज्य सरकारची संत नरहरी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना,

HTML img Tag Simply Easy Learning    
सामाजिक एकजूट आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना थेट समाज बांधवापर्यंत पोहोचवली जाणार आहे. वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मृणालिनी मैंदर्गीकर, संत नरहरी मंदिर समिती पंढरपूर चे माजी अध्यक्ष, विध्यमान जेष्ठ विश्वस्त प्रसिद्ध उद्योजक श्री. भारत कारीकर सोलापूर कोल्हापूर, ९६ वर्षीय जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री. वसंतराव पोतदार आलूरकर, युवा उद्योजक सर्वश्री गोरक्ष वेदपाठक मोडनिंब, प्रथमेश वेदपाठक माढा, अभिषेक पोतदार वागदरी, संस्थेचे अग्रणी प्रवर्तक मोहनराव मंद्रपकर, संजयजी मैंदर्गीकर, संतोषशेठ कळमणकर, पत्रकार विनोद पोतदार, दत्तगुरु वेदपाठक, सोनार संघटनेचे माजी अध्यक्ष सुनील पंडित यांनी केलेल्या आवाहनानुसार माहिती अभावी कोणीही लाभापासून वंचित राहू नये हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
पंढरपूर मंदिर समितीचा गौरव महाराज यांच्या समाधी मंदिर समिती पंढरपूर चे नव नियुक्त पदाधिकारी, विश्वस्त आणि सल्लागार मंडळीचा समाज आपले आराध्य दैवत श्री. संत नरहरी होणारा विशेष सत्कार हा या सोहळ्याचा भावनिक आणि श्रद्धेचा भाग आहे. यामुळे समाजातील संस्थांत्मक बांधीलकी अधिक घट्ट होईल.
थोडक्यात सोलापूरच्या शिक्षण। सहकार सोनार समाज संस्थेने आयोजित केलेला हा राज्यातला अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असावा. संस्थेचे अग्रणी प्रवर्तक संस्था सोत मोहनराव मंद्रूपकर, संजयजी मैंदर्गीकर, संतोषशेठ कळमणकर अध्यक्ष वसंत पोतदार, उपाध्यक्ष विजयकुमार पोतदार, सचिव दत्तगुरु वेदपाठक, सहसचिव गिरीश जमखंडीकर, खजिनदार गजानन सोनार, संचालक इंजि. विजयकुमार पोतदार, इंजि. रुद्रप्पा दोडमनी, प्रा. डॉ. अमर दीक्षित, सौं. चित्रा पोतदार या सर्वांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. २८ डिसेंबर चा हा सोहळा केवळ कार्यक्रम ण राहता तो समाजाच्या आर्थिक * ।। प्रगती आणि सामाजिक क्रांतीची नांदी ठरेल यात शंका नाही. सर्व समाज बांधवानी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या समाजाला समृद्धीच्या वाटेवर नेण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button