भालकी तालुक्यातील भातंब्रि येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक
राष्ट्रीय संत श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न

भालकी तालुक्यातील भातंब्रि येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक


अक्कलकोट प्रतिनिधी
बसवराज बिराजदार


बोलो भारत माता की जय! वंदे मातरम! राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे! भारतरत्न लाल बहादूर शास्त्री अमर रहेच्या जयघोष करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विविध वाद्यसह भव्य मिरवणूक रॅली काढण्यात आली.
मराठवाडा आणि कल्याण कर्नाटक सीमा भागातील बीदर जिल्हा भालकी तालुक्यातील भातंब्रि येथे जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रम जल्लोषात साजरी करण्यात आली.या भव्य मिरवणूक रॅली नंतर जय भवानी मंगल कार्यालय येथे धर्म सभेत रूपांतर झाले.

यावेळी ड्रॉ.श्री बसवलिंग अवदुत मल्लया गिरी मठ जरासंगम, ड्रॉ.शिवानंद महास्वामी हुलसुर, श्री गुरु बसव पट्ट देवरू भालकी,भात्रंबा येथील श्री शिवयोगीश्र्वर स्वामीजी यांच्या देश भक्ती वर प्रवचन कार्यक्रम झाला.यावेळी सर्व महास्वामीजीनी म्हणाले की, एक सन्यासी हवा मल्लिनाथ महाराज तिरंगा झेंडा हातात घेऊन सर्व धर्मीय समाज बांधवांना एकत्रित करून देश बांधण्यासाठी देशभर अहोरात्र झटत आहे. देश वाचला तर आम्ही सर्व जण वाचणार आहे.या देश भक्ती चळवळी मध्ये आत्ता आम्ही सर्व मठाधीस सहभागी होऊन सदगुरु हवा मल्लिनाथ महाराज यांच्या सोबत देश बांधण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. देशात आम्ही सर्व सन्यासी एकत्रित येऊन देसभक्ती रुजविण्याचे कार्य केल्यास भारत देश विश्व गुरु बनण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन यावेळी सर्व महास्वामीजीनी केले.
यावेळी उमरगा येथील ॲड. वर्षा जाधव यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर आपली मनोगत व्यक्त केली. बीदर,भालकी, नांदेड,लातूर,उमरगा आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. स्वागत जय भारत माता सेवा समिती भालकी तालुका अध्यक्ष पप्पू पाटील खानापूर आभार दीपक थंबके तर सूत्रसंचालन महादेव मुतंगे यांनी केले.