उद्या पासून गोगांव येथे श्री कल्लेश्वर महाराज यांच्या यात्रेस प्रारंभ*
श्री कल्लेश्वर महाराज यांच्या यात्रेस

*आज पासून गोगांव येथे श्री कल्लेश्वर महाराज यांच्या यात्रेस प्रारंभ*

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) :अक्कलकोट तालुक्यातील गोगांव येथे ग्रामदैवत श्री कल्लेश्वर महाराज यात्रा आज पासून सुरू होत असल्याची माहिती सरपंच सौ.वनिता सुरवसे यांनी दिली.
सालाबादा प्रमाणे श्री कल्लेश्वर महाराज यात्रा मोठ्या उत्साहात साजरा होत असून दिनांक १०/०४/२०२३ रोजी संध्याकाळी ठीक ८ वाजता उच्चई (लहान रथ ) कल्लेश्वर मंदिरा पासून हनुमान मंदिरापर्यंत नेला जातो , दिनाक ११/०४/२०२३ रोजी १२ वाजता रथावर कळसारोहण करण्यात येणार असून संध्याकाळी ८ वाजता रथोउत्सव होणार आहे. रात्री कन्नड नाटक होणार आहे, दिनांक १२/०४/२०२३ रोजी ३ वाजता जंगी कुस्ती आयोजित करण्यात आल्या आहेत, व त्यादिवशी च रात्री परत कन्नड नाटक होणार आहे. तरी सर्व भाविकांनी यात्रेनिमित्त आमच्या गावच्या जागृत देवस्थानाचे शिस्तीत दर्शन घेऊन यात्रा पंच कमिटीला व ग्रामपंचायतला सहकार्य करावे, प्रदूषणमुक्त यात्रा साजरी करून , सर्व शासकीय नियमाचे पालन करून यात्रा जल्लोषात साजरी करणार असे सरपंच सौ वनिता सुरवसे आणि उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी सांगितले.
वागदरी येथील यात्रेमध्ये झालेल्या दुर्देवी घटनेची दखल घेवून ग्रामपंचायत वतीने वैद्यकीय अधिकारी यांना पत्र देऊन डॉक्टर व ॲम्बुलन्स यांची व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली असून प्रथमोपचाराचे सर्व सुविधाचे नियोजन करण्यात आले आहे.
श्री कल्लेश्वर महाराज यात्रे निमित्त ११ व १२ या दोन्ही दिवशी महाप्रसदाची सोय करण्यात आल्याचे माहिती कलेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अशोक मुलगे, खजिनदार प्रदीप जगताप, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे व देवस्थान कमिटीने सांगितले आहे.
