स्वामीभक्तीतून जीवनाने अध्यात्माची कास धरली – गायक अतुल गोगावले
अतुल गोगावले कुटूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.

स्वामीभक्तीतून जीवनाने अध्यात्माची कास धरली – गायक अतुल गोगावले
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१२/११/२४)

जीवनातील स्वामींच्या प्रचितीनुसार
स्वामी समर्थांची अगाध लिला पाहून मीही धन्य झालो. कळत नकळत जीवन स्वामी भक्तीत गुंतत गेले. या स्वामी भक्तीतून जीवनाने अध्यात्माची कास धरली असे मनोगत सुप्रसिध्द अजय-अतुल जोडगोळीतील गायक अतुल गोगावले यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी
गायक अतुल गोगावले व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी अतुल गोगावले बोलत होते. पुढे बोलताना अतुल यांनी लवकरच वटवृक्ष मंदीरात स्वामीचरणी गायन सेवा अर्पण होण्यासाठी स्वामीचरणी साकडे घालून नतमस्तक झालो असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संतोष जमगे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – अतुल गोगावले कुटूंबियांचा
देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
