गावगाथा
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने चर्मकार समाजाच्या लाभार्थ्यांचे कर्ज माफ करावे!
निवेदन

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने चर्मकार समाजाच्या लाभार्थ्यांचे कर्ज माफ करावे!
HTML img Tag

अहमदनगर प्रतिनिधी (संतोष शिंदे)

:-संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने चर्मकार समाजाच्या लाभार्थ्यांचे कर्ज माफ करावे. चर्मकार संघर्ष समितीची मागणी.
संत रोहिदास चर्मकार चर्मोद्योग विकास महामंडळाच्या वतीने जिल्हा कार्यालय- अहमदनगर, यांचे माध्यमातून दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.वाजता *महामंडळाच्या योजनाचा प्रचार प्रसार कार्यशाळेचे* आयोजन *भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, सावेडी बस स्थानकाजवळ , अहमदनगर* या ठिकाणी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांनी ही मागणी केली.
महाराष्ट्र मध्ये शेतकरी राजा संकटात असताना राज्य सरकारने अनेकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी, तसेच अनेक उद्योजकांना केंद्र सरकारने कर्जामध्ये माफी दिलेली आहे.चर्मकार समाज सुद्धा हातावर पोट असणारा समाज आहे. कोविडच्या काळामध्ये समाजातील सर्व बांधवांना त्रास झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने चर्मकार बांधवांचे कर्ज त्वरित माफ केले पाहिजे. ही समाजाची भावना आहे.
त्याचप्रमाणे चर्मोद्योग महामंडळाला अहमदनगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. आजच्या घडीला एकच अधिकारी दोन जिल्ह्याचे काम (नगर आणि नाशिक)पाहत आहे त्यामुळे समाज बांधवांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे.
तसेच महामंडळासाठी महाराष्ट्र सरकारने ३०० कोटीची हामी घेतलेली आहे. ती एक हजार कोटी घ्यावी अशी समाजाची मागणी आहे .
आज झालेल्या कार्यक्रमांमध्ये शिवाजी साळवे यांनी वरील मागण्या केल्या आहे.