
डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार’ शिवशरणप्पा सुरवसे यांना जाहीर…..

वागदरी —-ड्रीम फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय “डॉ कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार “ वागदरी तालुका अक्कलकोट येथील सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिवशरणप्पा सुरवसे यांना जाहीर झाला आहे
शनिवारी ४ वाजता ड्रिम फाऊंडेशन सभागृह ,ओम गर्जना चौक जुळे सोलापूर येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
शिवशरणप्पा सुरवसे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात नाभिक समाजाच्या न्याय हक्कासाठी उन्नतीसाठी काम करतं असून त्याचा कार्याचा दाखल घेऊन भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्यांचे पुरस्कार सन्मानीत केले जाते. अशी माहिती काशीनाथ भतगुणकी संस्थापक अध्यक्ष ड्रिम फाऊंडेशन यांनी दिली आहे शिवशरणप्पा सुरवसे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या मित्र परिवारानी अभिनंदन केले आहे
