गावगाथा

क्षमता वृद्धी प्रशिक्षणातून शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल.- डॉ. ह.ना.जगताप

संगमेश्वर कॉलेजमध्ये अंतिम टप्प्यातील 'शिक्षक क्षमता वृद्धी ' प्रशिक्षण

क्षमता वृद्धी प्रशिक्षणातून शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल.- डॉ. ह.ना.जगताप

HTML img Tag Simply Easy Learning    

संगमेश्वर कॉलेजमध्ये अंतिम टप्प्यातील ‘शिक्षक क्षमता वृद्धी ‘ प्रशिक्षण

HTML img Tag Simply Easy Learning    

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मध्ये उल्लेखित केल्याप्रमाणे शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेमधील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत प्रत्येक शिक्षकाचे सक्षमीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धोरणातील तरतुदींनुसार शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने प्रस्तुत माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरांवरील शिक्षक क्षमता वृद्धी व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. म्हणून या प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. आपण नव्या बदलाला सामोरे जाऊन आपली वृद्धिंगत करणे गरजेचे आहे.एकूणच क्षमता वृद्धी प्रशिक्षणातून शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल.” असे प्रतिपादन जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. ह. ना. जगताप यांनी केले .ते राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्याकडून आयोजित केलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या अंतिम सत्र प्रशिक्षणात बोलत होते. व्यासपीठावर प्र. प्राचार्य ऋतुराज बुवा ,डायटचे अधिकारी प्रा.अरुण जाधव ,प्रा.डॉ.प्रभाकर बुधाराम,संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी संपूर्ण राज्यात वैविध्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. असे सांगत प्रा. अरुण जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
उद्घाटन सत्रात प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. शिक्षण निरीक्षक स्मिता नडिमेटला यांनी या तीन दिवसीय प्रशिक्षणातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मूलभूत तत्वे आपल्याला कसे आत्मसात करावयाची आहेत, तंत्रस्नेही आपल्याला कसे बनायचे आहे ?याबद्दल सांगत आपले मनोगत व्यक्त केले. उपप्रचार्य प्रसाद कुंटे यांनी हे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण नक्कीच लाभदायक ठरेल. यातून शिक्षकांना नवी तंत्रे शिकता येतील. असा विश्वास व्यक्त केला.
डॉ.जगताप पुढे म्हणाले की, ” हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षक निश्चितच प्रत्यक्ष वर्गांमध्ये प्राप्त नवीन ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग करतील ज्यायोगे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल. एकूणच नव्या प्रगत शैक्षणिक तंत्राचा देखील वापर या प्रशिक्षणानंतर शिक्षक करतील असा विश्वास वाटतो.”
या प्रशिक्षणामध्ये एकात्मिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून विविध 12 विषयांचा समावेश करण्यात आला आहे. प्रामुख्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020: प्रमुख वैशिष्ट्ये, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व आंतरसमवाय क्षेत्रे, नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्र, एकविसाव्या शतकातील कौशल्ये व भविष्यवेधी शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन, कुमारावस्थेतील मुले समजून घेताना, शाळा आधारित व क्षमता आधारित मूल्यांकन, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS), राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS), कार्यक्षमता प्रतवारी दर्शके (PGI) कार्यपद्धती व विश्लेषण, संशोधन कार्यपद्धती कृतिसंशोधन व नवोपक्रम, माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग व प्रभावी शैक्षणिक नेतृत्व इत्यादी विषयांच्या अनुषंगाने मार्गदर्शन सुरु आहे.
याप्रसंगी दयानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुण खांडेकर , वालचंद कॉलेजचे उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, जीवराज कस्तुरे यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (सुलभक) मार्गदर्शक तज्ञ प्रा.डॉ.प्रभाकर बुधाराम, प्रा.डॉ. गणेश मुडेगावकर, संतोष पवार, विजयकुमार वाघमोडे, नरेश पवार , डॉ. प्रशांत चाबुकस्वार ,राजशेखर बमगोंडे , प्रशांत शिंपी ,विश्वजीत आहेरकर हे प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करत आहेत. मनपा , शहर आणि दक्षिण, उत्तर तालुक्यातील २८८ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button