गावगाथा

चंद्रयान प्रतिकृती साठी, जागले, चव्हाण, जोशी सरांचा पुढाकार

कुर्ला पश्चिम येथील गांधी बाल मंदिर शाळेत दिनांक १२ ते १४ डिसेंबर २०२३ कालावधीत यशस्वी रित्या पार पडले.

चंद्रयान प्रतिकृती साठी, जागले, चव्हाण, जोशी सरांचा पुढाकार

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

नुकतेच बृहन्मुंबई उत्तर विभागाचे वॉर्ड स्तरीय विज्ञान प्रदर्शन कुर्ला पश्चिम येथील गांधी बाल मंदिर शाळेत दिनांक १२ ते १४ डिसेंबर २०२३ कालावधीत यशस्वी रित्या पार पडले.यावेळी शाळेत चंद्रयान ३ ची आकर्षक मोठी प्रतिकृती उभारण्यात आली होती.त्याच्या शेजारीच चंद्रयान सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आला होता.शाळेतील शिक्षक अवधूत चव्हाण, अमोल जागले व घनश्याम जोशी यांनी अहोरात्र मेहनत करून ही अवाढव्य प्रतिकृती उभारली होती.नुकतेच भारताने चंद्रयान मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केल्याने ही प्रतिकृती लक्षवेधक ठरली होती.

येणारे जाणारे अनेक मान्यवर, खासकरून विद्यार्थी, पालक शिक्षकगण येथे उभे राहून आपले फोटो काढून घेत होते.असे मेहनती शिक्षक आमच्याकडे आहेत याचा शाळेला नक्कीच अभिमान असल्याचे मुख्यध्यापक अनिल पांचाळ यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button