गावगाथा

स्वामींच्या वास्तव्यामुळे तिर्थक्षेत्र अक्कलकोटचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय – कॅबीनेट मंत्री भरत शेठ गोगावले

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर झालेल्या सत्काराप्रित्यर्थ बोलताना व्यक्त केले मनोगत.

स्वामींच्या वास्तव्यामुळे तिर्थक्षेत्र अक्कलकोटचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय – कॅबीनेट मंत्री भरत शेठ गोगावले

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर झालेल्या सत्काराप्रित्यर्थ बोलताना व्यक्त केले मनोगत.

(अ.कोट, दि.१०/१०/२५ – श्रीशैल गवंडी)
स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांप्रमाणे माझ्या कुटूंबियांसह मलाही श्री. स्वामी समर्थांच्या जागृततेची व त्यांच्या कल्पनाशक्तीची प्रचिती आली आहे. यामुळे जीवन स्वामीमय झाले आहे. माझ्यासह अनेक भाविकांच्या जीवनात स्वामी भक्तीला अग्रस्थान असल्याने माझ्या सह तमाम स्वामी भक्तांच्या भक्तीतून स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व स्वामींच्या वास्तव्यामुळे तिर्थक्षेत्र अक्कलकोटचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय होत असल्याचे
मनोगत महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी योजना खात्याचे कॅबीनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त संपतराव शिंदे व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते कॅबीनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी
कॅबीनेट मंत्री भरत शेठ गोगावले बोलत होते. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे विश्वस्त संपतराव शिंदे, प्रथमेश इंगळे, मोहोळ शिवसेना नेते
व राजू खरे, अमोल बापू शिंदे, महेश साठे,
अमर पाटील, बाबासाहेब पाटील, शिवशरण इचगे, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, सागर गोंडाळ यासह स्वामीभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – कॅबीनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करताना विश्वस्त संपतराव शिंदे, मा.आ.सिद्धाराम म्हेत्रे, प्रथमेश इंगळे
व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button