गावगाथा

वागदरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त लोकमंगल पतसंस्थे च्या वतीने कर्तुत्ववान महिलांचे सत्कार

महिला दिनानिमित्त विशेष

महिला दिनानिमित्त
लोकमंगल पतसंस्थेचे वतीने सत्कार सोहळा

अक्कलकोट
तालुक्यातील वागदरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त लोकमंगल पतसंस्थे च्या वतीने कर्तुत्ववान महिलांचे सत्कार करण्यात आले.
मार्च ८ शुक्रवारी संस्थेच्या सभागृहात या कार्यक्रम पार पडले. गावातील कर्तुत्ववान महिलांना शाल गुच्छ, भेट वस्तु देवून सत्कार करण्यात आले. शिक्षिका मनीषा कुन्हाळे, अंगणवाडी सेविका वर्षाराणी हन्नुरे, लिंबाबाई सुतारा, मुख्याध्यापिका शैलजा मुनोळी, खादी ग्रामोद्ध्योगाचे रमाबाई घुले, आशा वर्कर्स प्रवेक्षिका आशा सावंत यांचा शाल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सत्कार स्वीकारून आपले मनोगत व्यक्त करताना, मराठी शाळेच्या शिक्षिका मनीषा कुन्हाळे यांनी राष्ट्रपतींच्या सन्मानापेक्षा जन्मगावाचा सन्मान मोठा असल्याचे मत व्यक्त केले.कर्तृत्व मोठे किंवा लहान नसते. लोकमंगल पतसंस्थेने आमच्या कामगिरीची दखल घेऊन गौरव केला, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
सन्मान प्राप्त झालेल्या मुख्याध्यापिका शैलजा मुनोळी म्हणाल्या की, आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. कर्तृत्ववान महिलांची प्रेरणा घेऊन पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थे चे श्रीकांत सोमवंशी यांनी लोकमंगल समूह संस्थेच्या सामाजिक कार्यक्रमांविषयी सांगितले आणि संस्थेने आज आणलेले महिलांसाठीच्या नवीन योजनेचा लाभ घेण्याचे सांगितले.
लोकमंगला पतसंस्थेच्या सल्लागार कांताबाई पोमाजी, कलावती नडगेरी, बसम्मा सलगरे, माजी उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी, लक्ष्मीबाई आळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेजर कवडे, श्रीकांत वळसंग, प्रकाश पंडित, नागप्पा अष्टगी, कस्तुराबाई कोणजी, श्रीकांत सोमवंशी, चन्नवीर स्वामी, परमेश्वर पाटील, गुरुनाथ बरगले उपस्थित होते. संस्थेचे सल्लागार शिवानंद गोगाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर संस्थेचे व्यवस्थापक सिद्धराम लाळ सिरे यांनी आभार मानले.

फोटो –
अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने साधक महिलांचा गौरव करण्यात आला. लोकमंगल सल्लागार महिला आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button