श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील श्री गुरु लीलामृत पोथीच्या सामुदायिक पारायण सोहळ्याची सांगता.
शांभवी कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पारायणास बसलेल्या महिला भाविकांची ओटी भरून पारायण सोहळ्याची सांगता.

(अ.कोट, श्रीशैल गवंडी, दि.२५/०४/२५) येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने २६ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही दिनांक १५ एप्रिल ते २५ एप्रिल अखेर आयोजित करण्यात आलेल्या ५५ अध्यायाच्या श्री गुरुलिलामृत पोथीच्या सामुदायिक पारायण सोहळ्याची सांगता आज श्री येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील ज्योतिबा मंडपात मोठ्या भक्तीभावात झाली. मंदीर समितीने देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सालाबादाप्रमाणे यावर्षीही या पारायण सोहळ्याचे आयोजन करून भाविकांना या गुरूलिलामृत पोथी पारायण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. आज सकाळी १० वाजता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील ज्योतिबा मंडपात या गुरूलिलामृत पारायण सोहळ्यास बसलेल्या जवळजवळ २८० महिला भाविकांची तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सुविद्य पत्नी शांभवी कल्याणशेट्टी व मा.नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या सुविध्य पत्नी गौरी कल्याणशेट्टी यांच्या हस्ते ओटी भरून पारायण सोहळ्याची सांगता झाली. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवर्षी
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने पारायण सेवेचे आयोजन करण्यात येत असते. त्या अनुषंगाने यंदाही देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सालाबा दाप्रमाणे यंदाही अखंड भक्तीभावाने व मोठ्या श्रद्धेने अनेक महिला माता भगिनींनी या पारायण सोहळ्यात सहभागी होऊन या पारायण सेवेचे फलित प्राप्त केले आहे.
यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या सोलापूर,पंढरपूर, लातूर, पुणे, बारामती, मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट, येथील भजनी मंडळांची भजन सेवा होऊन दुपारी ४ वाजता भजन सेवेची सांगता झाली. त्यानंतर पंडित प्रसन्न गुडी यांच्या भक्ती संगीताने धर्मसंकीतन महोत्सवाची सांगता झाली. यावेळी देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख, विश्वस्त महेश गोगी, शांभवी सचिन कल्याणशेट्टी, गौरी मिलन कल्याणशेट्टी, पूजा सागर कल्याणशेट्टी
विजया विजयकुमार सरदेशमुख,
शिवशरण अचलेर, प्रदिप हिंडोळे,
श्रीपाद सरदेशमुख, सागर गोंडाळ, अमर पाटील, गिरीश पवार, महेश मस्कले, अविनाश क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!