ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर सावलीत ठेवले त्यांना उन्हात ठेवू नका-चंद्रकांत रमणशेट्टी
सामाजिक बांधिलकी

ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर सावलीत ठेवले त्यांना उन्हात ठेवू नका-चंद्रकांत रमणशेट्टी

सोलापूर समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय शेळगी परिसर येथे आज सत्कार करताना अण्णासाहेब कोतले यांनी मुलांना आई वडिलांचे आधार कार्ड बनण्याचे आवाहन केले.चंद्रकांत रमण शेट्टी यांनी घरातील ज्येष्ठ व आई-वडिलांच्या कार्याचा गौरव केला.या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते मा. अण्णासाहेब कोतली, प्रमुख पाहुणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समिती सदस्य मा. महादेव माने व प्रभाग क्रमांक एक चे नगरसेवक मा.अविनाश पाटील यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विमल पवाडे व महानंदा बावी यांनी तुम्ही हो माता या प्रार्थनेने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संस्थापक आर.व्ही. तपसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबुराव नरूणे यांनी केले. या सोहळ्यामध्ये मा.नरेंद्र गंभीरे यांचा सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेचे नूतन चेअरमन म्हणून निवड झाल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष मा अण्णासाहेब गोखले यांनी शाल,पुष्पहार, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन केला. पो स ई राजशेखर नागशेट्टी यांची पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार महादेव माने यांनी शाल,पुष्पहार, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन केला.मा.चंद्रकांत रमण शेट्टी यांचा सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल अविनाश पाटील यांनी शाल,पुष्पहार, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन केला. सत्काराला उत्तर देताना नरेंद्र गंभीरे यांनी आई-वडिलांच्या कष्टाचे महत्त्व सांगितले व ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर सावलीत ठेवलं त्यांना मात्र उन्हात ठेवू नका असा मोलाचा सल्ला उपस्थितांना दिला. समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ समर्थपणे कार्य करत आहे.त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. विरंगुळा केंद्र म्हणजे ज्येष्ठांचे मंदिर आहे असे उद्गार नरेंद्र गंभीरे यांनी संघाच्या गौरवासाठी काढले तर राजशेखर नागशेट्टी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच आई-वडिलांच्या दृष्टीने मुलाची जबाबदारी,यामध्ये कायद्याचा सहभाग व शासकीय योजना उपस्थितांसमोर सादर केल्या. चंद्रकांत रमणशेट्टी यांनी उपस्थितांना बचतीचे महत्त्व, पतसंस्थेचे कार्य तरुण वर्गाला पटवून दिला. याप्रसंगी समर्थ ज्येष्ठ संघास टेबल व फोटो दिल्याबद्दल गुरुशांत तोंडावळे व कीर्तीचा सुगंध या ग्रंथाची महाराष्ट्र शासनमान्य ग्रंथ सूचीमध्ये समाविष्ट केल्याबद्दल लेखक अशोक खानापुरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 16 ज्येष्ठांचा वाढदिवसाप्रित्यर्थ सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे महादेव माने यांनी ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव मोठा असून तरुणाईने यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे सांगितले तर अध्यक्षीय समारोपात अण्णासाहेब कोतले यांनी समाजाचे ऋण विविध सामाजिक कार्यातून फेडण्याची प्रेरणा दिली.अविनाश पाटील यांनी आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन योजनेतून आवश्यक त्या सर्व गोष्टी पुरवण्याचे आश्वासन दिले. सत्कार सोहळयानंतर उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुरेश तानवडे यांनी तर आभार प्रा.अशोक म्हमाणे यांनी मांडले. कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.यावेळी शिवलिंग शहाबादे, अप्पाराव विभुते, मन्मथ कोनापुरे, चंद्रकांत बिराजदार, दत्तात्रय जाधव अनेक ज्येष्ठ सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.खेळीमेळीच्या वातावरणात सत्कार सोहळा संपन्न झाला.
