गावगाथा

कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरूम येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात

वार्षिक स्नेहसंमेलन 2024

कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरूम येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात

मुरुम प्रतिनिधी – भारत शिक्षण संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरूम येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या स्नेहसंमेलनाच्या समारंभासाठी अध्यक्ष म्हणून भारत शिक्षण संस्थेचे संचालक श्री त्र्यंबक बाबा इंगोले हे होते यावेळी संचालक तानाजी भाऊ फुगटे , महाविद्यालयाचे प्राचार्य डी टी इंगोले ,प्रमुख पाहुणे मुरूम पोलीस स्टेशनचे एपीआय पवन इंगळे साहेब पोलीस उपनिरीक्षक गाडेकर साहेब प्रमुख उपस्थिती प्रा शैलेश महामुनी हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचा पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन मध्ये उत्साह मध्ये सहभाग नोंदवला नृत्य गायन पथनाट्य तसेच शेलापागोटे चा कार्यक्रम अति उत्साहात पार पडला तसेच महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक नियतकालीन वयोमानाने श्री बेलकुने गणपत गोविंदराव हे सेवानिवृत्त झाले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शालेय समितीचे अध्यक्ष त्र्यंबक बाबा इंगोले संचालक तानाजी फुगटे व महाविद्यालयाचे प्राचार्य डी टी इंगोले व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सह पत्नी सत्कार करण्यात आला यावेळी वडदरे सर ,राम जाधव सर, दत्ता इंगळे सर, देशमुख सर प्रा मोठे सर प्रा पंचगले सर, जिवन जाधव सर, चनशेट्टी सर आदींनी प्रा बेलकोने सरांचा सत्कार केला, स्नेहसंमेलनासाठी प्राध्यापक महामुनी यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास यावर अनमोल असे मार्गदर्शन केले या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्साहाने सहभाग नोंदवला तसेच माकणी येथील बीएसएस कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये कैलासवासी शिवाजीराव दाजी मोरे अंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेमध्ये उत्कृष्ट साघिक संघ महाविद्यालयातील कुमारी पटेल शिफा इलाही व कुमारी जाधव शुभांगी खुबा या विद्यार्थ्यांनी पटकावला पाच हजार एक रुपये व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राठोड सर क्रीडा अहवाल वाचन गोविंद इंगोले सर तसेच सांस्कृतिक विभाग वार्षिक बक्षीस वितरण अहवाल वाचन प्राध्यापक विनय इंगळे यांनी केले तसेच विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये विविध स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या ना बक्षीस वितरण करण्यात आले हे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्रा.विजया बेलकेरी,प्रा. वर्षा हुलगुंडे , प्रा.बाळु इंगोले ,प्रा.साधु गायकवाड सर, प्रा. प्रकाश चव्हाण ,प्रा. श्रीकांत शिंदे , प्रा.रोहन हराळकर ,प्रा.गजानन उपासे ,प्रा.कांबळे ,प्रा. चिकुंद्रे ,प्रा.प्रसाद इंगोले,अवधूत गुरव ,सय्यद इमरान, विलास चव्हाण, अनिकेत सगट, आदींनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button