गावगाथा

शैलेश गायकवाड मुंबई विद्यापीठात एमबीए मध्ये सर्वप्रथम.

प्रथम क्रमांक

शैलेश गायकवाड मुंबई विद्यापीठात एमबीए मध्ये सर्वप्रथम.
(मुरुम प्रतिनुधी) सिडेनहॅम महाविद्यालय चर्चगेट मुंबई येथून शैलेश श्रीकांत गायकवाड यांनी एमबीएच्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. ते उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील रहिवासी आहेत.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सिडेनहॅम महाविद्यालय हे आशिया खंडातील सर्वात प्राचीन व प्रतिष्ठित मानले जाते. याच महाविद्यालयात 10 नोव्हेंबर 1918 ते 11 मार्च 1920 या कालावधीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‘राजकीय अर्थशास्त्र’ या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, ही बाब अत्यंत प्रेरणादायी ठरते. एमबीएचे शिक्षण घेतल्यास विशेषतः कार्पोरेट सेक्टर मध्ये चांगल्या संधी प्राप्त होतात. नुकतेच शैलेश ची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे मुंबई येथील टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापन विभागात निवड झाली आहे. माननीय रतन टाटा यांनी अनेकांना रोजगारच नाही तर अगनीत स्वप्ने दिली,त्यांच्या प्रेरणेतून ही कंपनी साकार झाली आहे. देशभरातील 54000 सल्लागारांना रोजगाराची संधी देणाऱ्या या कंपनीचे नेटवर्क व्यापक व मजबूत आहे.
यापूर्वी शैलेशचे बी.टेक.केमिकल इंजीनियरिंगचे शिक्षण आण्णा विद्यापीठ चेन्नई येथून झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button