गावगाथा

तालुक्यातील गट सचिवांच्या न्याय हक्कासाठी रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत राहू ;  अक्कलकोट तालुका गटसचिव संघटनेचे नूतन अध्यक्ष तुकाराम शिंदे

तुकाराम शिंदे यांच्या निवडीबद्दल माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व त्यांचे पुत्र रमेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील गट सचिवांच्या न्याय हक्कासाठी रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत राहू ;  अक्कलकोट तालुका गटसचिव संघटनेचे नूतन अध्यक्ष तुकाराम शिंदे

अक्कलकोट :* (प्रतिनिधी)

*तालुक्यातील गट सचिवांच्या न्याय हक्कासाठी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व त्यांचे पुत्र रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत राहू अशी ग्वाही अक्कलकोट तालुका गटसचिव संघटनेचे नूतन अध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी दिली.*

माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या निवासस्थानी अक्कलकोट तालुका गटसचिव संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत अक्कलकोट तालुका गटसचिव संघटनेच्या अध्यक्ष पदी तुकाराम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना शिंदे हे बोलत होते.

तुकाराम शिंदे यांच्या निवडीबद्दल माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व त्यांचे पुत्र रमेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बँक अधिकारी भिमाशंकर विजापुरे, शिवशंकर कोरपे, तालुका समन्वयक – संजय याबाजी, अशोकराव शिंदे, मल्लिनाथ पनशेट्टी, विठ्ठलराव देसाई शिवानंद विजापुरे, शिवलिंगप्पा अणची, संतोष माशाळे, देवराज पाटील, यशवंतराव बासलेगावकर, राजकुमार बगले, शामराव बरगुडे, प्रभूराज हिरेमठ, रमेश कौटगी, लक्ष्मिपुत्र हालोळी, सिद्रय्या चडचण, अंबण्णा दुलंगे, इरेश कोन्हाळे, अमसिद्ध बिराजदार, शिवाजीराव भोसले, विरुपाक्ष मडसनाळ यांच्यासह आदिजन कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button