गावगाथाठळक बातम्या

Akkalkot MSRTC : अक्कलकोट आगारातील ६० पैकी इतक्या बसेस आहेत खराब ; प्रवाशांचे जीव धोक्यात

अक्कलकोट : (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळ अक्कलकोट आगाराकडे ६० लाल पऱ्यांपैकी ३५ बस गाड्या ह्या कंडम झाल्या असल्यातरी त्या उपप्रादेशीक परिवहन विभागाकडून (आर.टी.ओ.) फिटनेस घेऊन तश्याच चालविल्या जात आहेत. अशा परिस्थिती मुळे प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लगत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

राज्यात सार्वजनिक वाहतूक म्हणून रा.प.म.ची बस ही महत्वाची प्रवासी सेवा आहे. मेट्रो शहरातील काना कोपऱ्यात जाण्यासाठी बस ही व्यवस्था असताना याकडे महामंडळाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट चे बसस्थानक ५ दशका नंतर रुपेड पालटताना दिसत आहे. बसस्थानक सुधारत असताना बस चा विषय हा चर्चेचा बनत चालला आहे. 

अक्कलकोट आगाराच्या माध्यमातून दूरवरची सेवा राज्यासह परराज्यात दिली जाते, श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त रा.प.म. बस मधून ये जा करतात. महामंडळाला एक उत्पन्न देणारे आगार म्हणून राज्यात ओळखले जात आहे. मात्र तेथील बसची अवस्था दयनीय झाली आहे. एकूणच ६० पैकी ३५ बसेस ह्या चालक केबिन मधील यंत्र सामुग्री पासून ते शेवटच्या शीट पर्यंतचे सर्वच शिट्स, खिडक्या तावदाने, बस ह्या मागील बाजूने ४५ ते ९० अंशाच्या कोनात वाकलेले, अंतर्गत लाईट यांची दुरावस्था पाहायला मिळत आहे.

अक्कलकोट आगाराची शनिवारी सोलापूर हून अक्कलकोटला जाणारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराच्या बस चालकाने आगारातील मेकानिक हेडला चक्क स्टेरिंगची अवस्था हलवून दाखवली यावेळी हेड मेकानिकने सदर चालकास सदरची तक्रार लॉकशीटला नोंदवावी असा सल्ला दिला. सदर चालकाने बसच्या तक्रारी बाबत लॉक सीट देखील पुरणार नाही अशी मुश्कील टिप्पणी नोंदवताच उपस्थित प्रवाश्यांनी महामंडळाच्या कारबारावर सडकून टीका केली.

या सह अक्कलकोट आगाराचा इलेक्ट्रिक बसचा मंजूर प्रस्ताव हा चार्जिंग स्टेशनचा विषय सद्या लाल फितीत अडकला आहे. महाराष्ट्राच्या या नविन सरकारने तीर्थ क्षेत्र अक्कलकोट करिता नविन बस गाड्या त्वरित १०० बस गाड्या या मध्ये इलेक्ट्रिकचा देखील समावेश असावा अशी मागणी स्वामी भक्त व तालुका वासियातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button