
*चपळगाव सेमी इंग्लिश स्कूलमध्ये प्लास्टिक कचऱ्याची होळी!*
🔥🔥🔥🔥🔥🔥

चपळगाव दि.25/03/2024
फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेस वसंत ऋतुचे आगमन व हिवाळा ऋतुची सांगता आणि आळस, दारिद्र्यता, निरुत्साह, नकारात्मक विचार दूर करून चांगुलपणाची रुजवणूक करण्यासाठी आपल्या संस्कृतीत होळी सण साजरी करतात.
ग्रामीण विद्या विकास सेमी इंग्लिश स्कूल, चपळगाव येथे विध्यार्थ्यांनी परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून या कचऱ्याची होळी साजरी केली.
पर्यावरणात प्लास्टिक पिशव्या म्हणजे घनकचरा.त्यामुळं या कचऱ्याचे विघटन होण्यास खूप कालावधी जातो.
सेमी इंग्लिश स्कूल प्रमुख कु. गोविंदे मॅडम व त्यांचे सर्व सहकारी शिक्षिका वर्ग यांच्या मार्गदर्शनातून विध्यार्थ्यांनी अश्याप्रकारच्या उत्सवातून एक चांगले उपक्रम करून पर्यावरपूरक विचार समाजासमोर ठेवले आहे.
💐💐💐💐💐💐💐
