नीट परिक्षेतील यशाबद्दल झाला सन्मान.कु. प्रतिभा जनगोंडा हिचा सत्कार करताना महेश इंगळे, मा.आ.सिद्धाराम म्हेत्रे व अन्य दिसत आहेत.
नीट परिक्षेतील यशाबद्दल झाला सन्मान.

कु.प्रतिभा जनगोंडाचा वटवृक्ष मंदीरात सन्मान.

नीट परिक्षेतील यशाबद्दल झाला सन्मान.

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२०/४/२३) –
येथील श्री शहाजी प्रशालेची माजी विद्यार्थिनी क़ु.प्रतिभा जनगोंडा या विद्यार्थीनीने वैद्यकीय शिक्षणात भरघोस यश संपादन करून नीट परीक्षेतील उज्वल यशाचे शिखर गाठले आहे. सन २०१८ मध्ये मुंबईच्या सेठ जी.एस.मेडिकल कॉलेजमध्ये
वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. शिक्षणाकरिता प्रवेश घेतल्यानंतर सन २०१८ ते २३ या कालावधीत वैद्यकीय शिक्षणात यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्याने यश संपादन झाले. कु जनगोंडाच्या यशाबद्दल येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान च्या वतीने देवस्थान कार्यालयात महेश इंगळे व मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी प्रतिभा जनगोंडाचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी महेश इंगळे यांनी बोलताना प्रतिभा जनगोंडा ही माजी नगरसेवक रामचंद्र समाणे यांची भाची आहे. वैद्यकीय शिक्षण हे खूपच गुंतागुंतीचे आहे. अशा या शिक्षणात जनगोंडाने ६१५ गुण मिळवून देशात आठशे दहावा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. वैद्यकीय क्षेत्रात विविध संशोधनात्मक कार्य जनगोंडाने यापुढे भविष्यात करीत राहाव्यात याकरिता स्वामी समर्थांचे आशीर्वाद व आमच्या शुभेच्छा तिच्या पाठीशी असून यापुढेही तिने आपले कष्ट सुरू ठेवून तालुका वासियांची सेवा करावी असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, संजय पवार, आणि जनगोंडा कुटुंबीय उपस्थित होते.

फोटो ओळ – देवस्थान कार्यालयात कु. प्रतिभा जनगोंडा हिचा सत्कार करताना महेश इंगळे, मा.आ.सिद्धाराम म्हेत्रे व अन्य दिसत आहेत.
