गावगाथा

आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी पंचप्पा सोनकवडे यांची निवड…

पुरस्कार सन्मान

आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी पंचप्पा सोनकवडे यांची निवड…

सोलापूर —- दि.(प्रतिनिधी) गेल्या पंधरा वर्षापासून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन (एनजीओ) कोल्हापूर, यांच्यावतीने यंदाच्या वर्षी दिल्या जात असलेल्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत शिक्षकांची पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली. त्यात अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील श्री.एस.एस.शेळके प्रशालेचे सहशिक्षक पंचप्पा बसवंत सोनकशडे यांची राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार २९ सप्टेंबर रोजी ११ वाजता येथील हिराचंद नेमचंद वाचनालय अम्पी थियटर ,मुरारजी पेठ सोलापूर होत असल्याची माहिती संस्थेच्या वतीने एका पत्रकान्वये देण्यात आली.


आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन (एनजीओ) कोल्हापूर जिल्हा सोलापूर शाखेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत शिक्षक दिनानिमित्त या गुणवंत शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
राज्य व राष्ट्रीय स्तरावरील आविष्कार फौंडेशन, इंडिया (कोल्हापूर – महाराष्ट्र राज्य) ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय सांस्कृतिक क्षेत्रात गेली १५ वर्षे कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. २०२४ च्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने जाहीर झालेल्या पुरस्कारांचा वितरण सोहळा सोलापूर येथे संपन्न होत आहे.
वागदरी गुणवंत शिक्षक पंचप्पा सोनकवडे यांना पुरस्कारासाठी निवड झाल्या बद्दल शाळेत शिक्षकवृंद,मित्र परिवार अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button