
वागदरीत पारंपरिक पद्धतीने सर्जा राजाच्या बैलगाडीतून निघाली वरात …


लग्न हा सर्वांच्या आयुष्यातील महत्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. हा आनंद द्विगुनीत करण्यासाठी वधू– वरांची मोठ्या प्रमाणात हौस केली जाते. त्या हौसेला कोणतेही मोल नसते.लग्न सोहळा म्हटलं की चकाचक गाड्या, वधु वराची भरपूर फुलांनी सजवलेली कार, बँड आणि डीजेच्या आवाजात निघालेली वरात, वऱ्हाडी मंडळींचा डान्स, धिंगाणा,असं काही चित्र आजकाल पहायला मिळत आहे.विशेष म्हणजे, ही सजावट आणि थाट-माट करण्याची स्पर्धाच जणू आयोजकांमध्ये लागलेली दिसते.या सगळ्यांना फाटा देऊन जुन्या काळात जसं बैलगाडीतून पारंपरिक पद्धतीने वरात निघत तसे पुन्हा एकदा अनेक लोक जुन्या पद्धतीचे अनुकरण करू लागले आहेत. महागड्या गाड्याऐवजी वरात बैलगाडीतून काढू लागले आहेत असे चित्र पुन्हा गावखेडयात दिसू लागले आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमेलगत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात असेच अनोखं वधू वराचे वरात पाहण्यास मिळाले.वागदरी येथील स्व.परमेश्रर मातनळ्ळी यांच्या दोन्ही मुलांचे सिध्दाराम परमेश्वर मातनळ्ळी व योगीनाथ परमेश्वर मातनळ्ळी यांचा शुभ विवाह संपन्न झाला. लग्न झाल्यानंतर पारंपरिक पध्दतीने वर सिध्दाराम वधू मधुश्री व वर योगीनाथ वधू मनिषा यांचा वरात सर्जा राजाच्या बैलगाडीतून निघाली बैलजोडीला अतिशय सुंदररित्या सजवले होते.

जुन्या काळी तीस वर्षांपूर्वी बैलगाडीतून पारंपरिक पध्दतीने वरात निघत असे सध्याच्चा आधुनिक तंत्रज्ञानाचा डिजिटल युगात पारंपरिक बैलगाडीतून वरात लोक विसरून गेले होते.पण मातनळ्ळी परिवाराने पुन्हा एकदा पारंपरिक पध्दतीने बैलगाडीतून वरात काढून वेगळा आदर्श ठेवला आहे.अनोख्या वरातीचे चर्चा मात्र सर्वत्र होतं आहे.
